हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे सायकल रॅलीला मोठा प्रतिसादमान्यवरांनी सायकल चालवून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश


पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू , खासदार नवनीत राणा यांचा उपक्रमात सहभाग                        

       महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी आज सायकल चालवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धनासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे शहरात सायकल रॅली काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुलात त्याच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सायकल चालवून उपस्थितांमध्ये उत्साह जागविला. 
        पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सायकल चालवली व रॅलीत सहभागी व्यक्तींशी दिलखुलास संवाद साधला. आमदार सुलभा खोडके, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, हिंदुस्थान पेट्रोलियमचे नागपूर क्षेत्रीय प्रबंधक मुकुंद जवंजाळ, क्षेत्रीय विपणन अधिकारी विशाल सूर्यवंशी, विनोद साळुंखे आदी उपस्थित होते. 
         प्रदूषण रोखण्यासाठी निसर्ग आणि मन दोहोंची जपणूक करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅलीसारखे उपक्रम सतत राबवले जावेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
           पर्यावरण जपण्यासाठी 'अधिक सायकल, कमी मोटरसायकल' हा मंत्र अवलंबला पाहिजे, असे जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले. खासदार श्रीमती राणा, आमदार श्रीमती खोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवकांसह ज्येष्ठांनीही रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती