Posts

Showing posts from January, 2023

अंतरिम आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान

Image
  अंतरिम आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान        अमरावती, दि. 30 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान झाले. याबाबत मतदान पथकांच्या नोंदी व दस्तऐवज यांच्या संपूर्ण तपासणीअंती अंतिम आकडेवारी जाहीर होईल. या आकडेवारीत काहीसा बदल संभवतो. या निवडणूकीत एकूण 23 उमेदवार निवडणूक लढत आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाला आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 5.49 टक्के मतदान झाले. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्रावर 4.25 टक्के, अकोला जिल्ह्यात 61 मतदान केंद्रावर 5.53 टक्के, बुलडाणा जिल्ह्यात 52 मतदान केंद्रावर 6.38 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 48 मतदान केंद्रावर 5.78 टक्के, वाशिम जिल्ह्यात 26 मतदान केंद्रावर 7.42 टक्के मतदान झाले. दुपारी 12 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 13.69 टक्के, अकोला जिल्ह्यात 14.65 टक्के, बुलडाणा   जिल्ह्यात 17.89 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 18.07 टक्के तर वाशीम 19.39 टक्के मतदान झाले आहे. दुप

मेळघाटात पहिले पक्षी सर्वेक्षण; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद मेळघाटात पक्ष्यांच्या दहा नवीन प्रजातींची भर

Image
  मेळघाटात पहिले पक्षी सर्वेक्षण; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद मेळघाटात पक्ष्यांच्या दहा नवीन प्रजातींची भर   अमरावती दि. ३० : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे दि. २६ ते २९ जानेवारीदरम्यान करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली.   त्यात मेळघाटात आढळणा-या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, प. बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सर्वेक्षण मोहिमेत सहभागी झाले होते. अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. तिथून सर्व सहभागींपैकी प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागांत विविध ठिकाणी रवाना झाली. सर्वेक्षणाच्या पहिल्या व दुस-या दिवशी प्रत्यक्षात पक्षी अभ्यास व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व माहितीची ई-बर्ड या संकेतस्थळावर तसेच प्रपत्रांमधे लिखित स्वरुपात नोंद करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातीं

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

Image
  अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे मास्टर ट्रेनरकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण        अमरावती, दि. २७ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन नियोजनबध्दरित्या अचूकपणे कामे पार पाडावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपटट्टे यांनी आज येथे दिले.          पदवीधर मतदार संघाच्या 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने नियोजनभवन येथे मतमोजणीचे सादरीकरणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., यवतमाळचे

आदिवासींव्दारे निर्मित उत्पादनांच्या विक्री केंद्र ‘आदिहाट’ चे थाटात उद्घाटन हस्तकला, बांबुकला, चित्रकला व खाद्यपर्दांचे विविध विक्री स्टॉल्स

Image
  आदिवासींव्दारे निर्मित उत्पादनांच्या विक्री केंद्र ‘आदिहाट’ चे थाटात उद्घाटन हस्तकला, बांबुकला, चित्रकला व खाद्यपर्दांचे विविध विक्री स्टॉल्स       अमरावती, दि. २६ : आदिवासी समाज हा राज्याच्या विविध डोंगराळ व दुर्गम भागामध्ये वास्तव्य करतो. त्यांची स्वतंत्र अशी संस्कृती असून ती संपन्न आणि समृध्द आहे. तसेच त्यांची जीवनशैली सुध्दा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तीचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  आदिवासी समाजातील व्यक्तींच्या उपजत कौशल्याला प्रामुख्याने हस्तकला, बांबुकला, चित्रकला इत्यादी तसेच  आदिवासी भागात उत्पादीत रानमेवा, वनौषधी, कृषी उत्पादने, विशिष्ट खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी हक्काचे ठिकाणी मिळावे, यासाठी ‘आदिहाट’ ही संकल्पना आदिवासी विकास मत्र्यांच्या संकल्पनेतून विभागात राबविली जात आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर येथील अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘आदिहाट’ या विक्री केंद्राचे आज अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.            यावेळी जात पडताळणी समितीच्य

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

Image
  ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद   अमरावती ,  दि .26 : ‍‍प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबध्द कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली. यावेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेले होते. मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध सुरक्षादलांच्या व  विभागांच्या चमूमार्फत शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. त्यात  एकूण 17 पथकांनी भाग घेतला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते.    राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिलाविषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतुक पथक, पोलीस बॅन्ड पथकाने दिमाखदार पथसंचलन करुन सर्वांची मने जिंकली. स्कुल ऑफ स्कॉलर्स राजमाता जिजाबाई गाईड पथक

भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

Image
  भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे              अमरावती, दि. 26 : जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फ