लेखा व कोषागारे विभागाची कला व क्रीडा स्पर्धा 27 जानेवारीपासून

 लेखा व कोषागारे विभागाची कला व क्रीडा स्पर्धा 27 जानेवारीपासून


       अमरावती, दि. 19 : वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे तथा स्थानिक निधी लेखा कर्मचारी कल्याण समितीमार्फत दि. 27 ते 29 जानेवारीदरम्यान श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतंर्गत श्री. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, मोर्शी रोड येथे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत 13 वैयक्तिक व 4 सांघिक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत वित्त विभागांतर्गत राज्यभरातून सुमारे 1500 खेळाडू व कलावंत सहभागी होणार आहेत. श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील नामवंत खेळाडू, प्रशिक्षक व पंच, क्रीडा समितीच्या विभागीय अध्यक्षा शिल्पा पवार, स्थानिक निधी लेखा सहसंचालक दीपक भिलपवार, नगरपालिका लेखा परीक्षक राम चव्हाण तसेच संघटनचे पदाधिकारी, वित्त विभागील अधिकारी-कर्मचारी यांची क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाबाबत नुकतीच बैठक झाली.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती