Thursday, January 12, 2023

महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीच्या अर्जांची त्वरित पूर्तता करावी

 महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्तीच्या अर्जांची त्वरित पूर्तता करावी


अमरावती, दि. 12 : सामाजिक न्याय विभागामार्फत ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्याक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.

या योजनांचे सन 2022-23 वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. परंतु अद्यापही संबंधित महाविद्यालयांनी अर्ज मंजूरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर केले नाहीत. यामध्ये मदनलाल मुंदडा कला, वाणिज्य महाविद्याल, चांदुर रेल्वे, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, अमरावती, विद्यानिकेतन औषध निर्माण शास्त्र, अंजनगाव सुर्जी, जागृत विद्यालय, वरुड, कृषी तंत्रनिकेतन, सावनेर, कला महाविद्यालय, बडनेरा, स्व.आर.जी. देशमुख कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, तिवसा, जे.डी. कृषी तंत्र विद्यालय, सांगळुद, भारतीय महाविद्यालय, अमरावती तसेच नांदगाव हायस्कूल, नांदगाव खंडेश्वर या महाविद्यालयाचे अर्ज मोठ्या प्रमाणात महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. 

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्रचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगइनवर पाठवावे. तसेच विद्यार्थी लॉगइन त्रुटी पुर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत त्रुटीपूर्तता करुन पात्र अर्ज जिल्हा लॉगइनवर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. 

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...