मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण

                                         






                             अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक

 

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण

 

* पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

* 340 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण


अमरावती, दि. 24 : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी यासाठी त्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण नियोजन भवन येथे आज पूर्ण झाले.

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक 2023 कार्यप्रणालीबाबत प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांनाचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण प्रशिक्षक सहायक आयुक्त (भूसुधार) शामकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मोर्शी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, चांदुर रेल्वे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, रोहयो उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी                                 श्री. धायगुडे, दर्यापूर तहसीलदार योगेश देशमुख, तिवसा तहसीलदार वैभव फरताडे, तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पावरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे सादर करण्यात आले. यामध्ये निवडणूकीच्या संदर्भातील वैधानिक तरतूदी, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्ये, मतदार यादी व मतपत्रिकेची तपासणी, मतदार केंद्र उभारणी, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात करावयाची कार्यवाही, जम्बो मतपेटी तयार करणे, अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान करताना घ्यावयाची दक्षता, ओळखीबाबत आक्षेप, मतदानानंतर मतपेट्या सुयोग्य पध्दतीने सीलबंद करणे, निवडणूक सामग्री आदींबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रात्यक्षिकेव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.

मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेव्दारे माहिती देण्यात आली.

मतदान सोमवार, दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणूकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षेत सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशीलावर सविस्तर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अनुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती