सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय निवासी शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासून चांदुररेल्वे येथे सुरवात

 सामाजिक न्याय  विभागामार्फत शासकीय निवासी शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासून चांदुररेल्वे येथे सुरवात


अमरावती, दि. 19 : सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती कार्यालयामार्फत शासकीय निवासी शाळांचे जिल्हास्तरीय कला व क्रीडा अविष्कार 2022-23  अंतर्गत उद्या गुरुवार, दिनांक 19 जानेवारी  रोजी तालुका क्रीडा संकुल, चांदुर रेल्वे येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या 4 मुलांच्या व 3 मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या दोन गटातील विद्यार्थ्यांसाठी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, रिले-4x100 मीटर, लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच व खो-खो या खेळांचा समावेश राहणार आहे.

 सामाजिक न्याय विभागातंर्गत कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील क्रीडानैपुण्य विकसित व्हावे, यासाठी  कला व क्रीडा अविष्कार2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे.

 शुक्रवार, दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, तुळजापुर येथे जिल्हास्तरीय कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निरोगी वाढ, पौष्टीक आहार,  वैयक्तिक सुरक्षा, इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता, अंमली पदार्थांचा वापर, त्याची कारणे आणि प्रतिबंध या विषयावर भूमिका अभिनय, मुले व मुलांसाठी समानसंधी, मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबाची भूमिका, पर्यावरण संरक्षण मादक द्रव्याचे सेवन रोखणे, पौगंडावस्थेतील निरोगी नातेसंबध या विषयावर लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुका क्रीडा संकुल, चांदुर रेल्वे येथे आयोजित दोन दिवसीय कला व क्रीडा कार्यक्रम सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत चालणार आहेत. या क्रीडा स्पर्धेला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती