Wednesday, January 11, 2023

पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेबाबत तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

 

 

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

आचारसंहितेबाबत तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

 

अमरावती, दि. 11 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास नागरिकांनी (०७२१) २६६१३६४ किंवा २६६२७८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...