Posts

Showing posts from June, 2018
Image
नियोजन अधिकारी- कर्मचा-यांचे उल्लेखनीय कामाबाबत   जिल्हाधिका-यांकडून कौतुक अमरावती दि.30: जिल्हा वार्षिक योजनेबाबत प्रलंबित विनियोजन लेख्याबाबतची स्पष्टीकरणात्मक ज्ञापने विशेष मोहिम राबवून निपटारा केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी    जिल्हा नियोजन अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन व कौतुक केले.   वार्षिक योजनेतील प्रलंबित लेख्याबाबत स्पष्टीकरणे सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार नियोजन कार्यालयाने 2010-11 ते 2015-16 या कालावधीतील    प्रलंबीत विनियोजन लेख्यांचा निपटारा डिसेंबर महिन्यात विशेष मोहिम राबवून पूर्ण केला. या कामगिरीबाबत नियोजन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनीही कार्यालयातील सर्व सहका-यांचे अभिनंदन केले आहे. तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी र. पु. काळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, लेखा अधिकारी वर्षा पुसदकर, संशोधन सहायक बा. रा. तायडे, प्रशांत किटे, श्री. दळवी यांच्यासह सर्व सहका-यांचे कौतुक जिल्हाधिका-यांनी केले. नुकतेच त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दालनात बोलावून त्यांचा गौरव केला.   
Image
पालकमंत्र्यांकडून कृषी विभागाचा आढावा अमरावती, दि. 28 :    खरीप हंगाम लक्षात घेता शेतक-यांना बियाणे, खत, आवश्यक साधने मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.     जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, कृषी सहसंचाक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.          श्री. पोटे पाटील म्हणाले की, खरीपासाठी   शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणारी जे-एस 335 वाणाचे सोयाबीन बियाणे आदी सामुग्री तत्काळ मिळाली पाहिजे.    बियाण्याची अतिरिक्त 10 हजार क्विंटर मागणीही महाबीजकडे नोंदवली आहे. त्यामुळे ते सर्वत्र उपलब्ध असण्याची दक्षता घ्यावी. सर्व दुकानांची कसून तपासणी करावी व विक्रेत्यांकडून गैरप्रकार घडल्यास तत्काळ कारवाई करावी. स्थानिक परिस्थितीबाबत तालुका अधिकारी व कृषी सहायक यांच्याकडून वेळोवेळी माहिती घ्यावी. विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीत कुठलीही अडचण आल्यास ती तत्काळ दूर व्हावी. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पेरणीबाबत उचित मार्ग
Image
13 कोटी वृक्षारोपण मोहिमेचा आज शुभारंभ पालकमंत्र्यांनी घेतला मोहिमेचा आढावा अमरावती, दि.30: शासनाच्या 13 कोटी वृक्षारोपण मोहिमेसाठी महाराष्ट्र    सुसज्ज झाला असून हरित महाराष्ट्रासाठी मोहिम महत्वाचे पाऊल ठरेल. सर्व विभागांनी मोहिमेदरम्यान समन्वय ठेवून अधिकाधिक लोकसहभाग मिळवत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ उद्या 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मोहिमेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, महापालिका आयुक्त्‍ संजय निपाने, उपवनसंरक्षक हेमंत मीना आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात   यंदा वन विभागाकडून 8 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरणाकडून 5 लाख, ग्रामपंचायतींकडून 9 लाख 6 हजार व विविध विभागांकडून 3 लाख 44 हजार अशा    26 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याहून अधिक खड्डे व विविध प्रजातींची रोपे तयार आहेत. हरित सेनेंतर्गत सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक सदस्यांची नों
Image
वृक्षदिंडीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वृक्ष लागवड मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे -           पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील अमरावती, दि. 30 :  हरित महाराष्ट्रासाठी शासनाची 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम मोलाची ठरणार असून, विविध क्षेत्रांतील नागरिकांनी त्यात  सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. वनविभागातर्फे  मोहिमेनिमित्त वृक्षदिंडी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ झाली. खासदार आनंदराव अडसूळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपवनसंरक्षक हेमंत मीना आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभी दिंडीचे पूजन करण्यात आले.  त्यानंतर पालकमंत्री श्री. पोटे पाटील व खासदार श्री. अडसूळ यांनी पालखी खांद्यावर वाहून पुढे मार्गस्थ केली. पुढे सुंदरलाल चौक, पोलीस आयुक्त कार्यालय, विद्याभारती महाविद्यालय यामार्गे जात दिंडीचा वन कार्यालयात समारोप झाला. दिंडीत विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, महिला, अनेक संस्थांचे कार्यकर्ते आदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘वृक
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना मिळाला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य मुंबई ,  दि. 30 : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन ग ॉ थिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे आज ,  दि. 30 जून रोजी झालेल्या 42 व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. यापूर्वी अजंठा , एलिफंटा ,  वेरुळ व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे.             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर्जा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि दक्षिण
Image
एव्हरेस्ट मोहिमेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक मुंबई ,  दि. 29 : मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्री मोदी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांचे अनुभव ऐकून भविष्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. राज्यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटकपणा व साहसीवृत्तीला वाव मिळावा यासाठी  ' मिशन शौर्य ' ची आखणी करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत विकास सोयाम ,  शुभम पेंदोर ,  उमाकांत मडावी ,  छाया आत्राम ,  इंदू कण्णके ,  मनीषा धुर्वे ,  आकाश आत्राम ,  कविदास काटमोडे ,  आकाश मडावी आणि प्रमेश आळे या मुलांनी एव्हरेस्टवर चढाई केली होती. या मोहिमेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच कौतुक केले होते. आज या विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेतली. प
Image
महाराष्ट्रतील 99 लाखांपेक्षा अधिक लोकांना मिळणार अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ - गिरीश बापट नवी दिल्ली दि. 29 : महाराष्ट्रातील 99 लाखापेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायदयाचा लाभ मिळणार असल्याची ,  माहिती गिरीश बापट यांनी आज येथे दिली. येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. केंद्रीय राज्यमंत्री सी. आर. चौधरी ,  महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट तसेच  विविध राज्यांचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण मंत्री ,  वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यामुळे राज्यातील गरजू व्यक्तींना स्वस्त दरातील  धान्य पुरविले जात आहेत. यासाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्यात आलेली असून त्याला आधार कार्ड लिंक करण्यात येत आहेत. यामुळे अनेक बोगस शिधापत्रिका धारक उघडकीस आलेले आहेत. राज्यात बोगस शिधापत्रिका धारकांची संख्या जवळपास 10 ते 1
Image
राज्यातील  3  सागरी जिल्ह्यांच्या सीआरझेड व्यवस्थापन योजनेस दीड महिन्यात मंजुरी मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांनी दिले आश्वासन नवी दिल्ली दि.  29  : राज्यातील सिंधुदुर्ग ,  रत्नागिरी व मुंबई उपनगर या सागरी किनारा लाभलेल्या जिल्हयांना येत्या दीड महिन्यात सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) व्यवस्थापन योजनेस मंजुरी देण्याचे आश्वासन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज दिले.  येथील इंदिरा पर्यावरण भवन स्थित केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. यावेळी  झालेल्या बैठकीत राज्याच्या वने व पर्यावरण विभागाच्या विविध विषयांबाबत चर्चा झाली  व राज्याला  केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या विविध आवश्यक पर्यावरण विषयक मंजुरीचा आढावाही घेण्यात आला. केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी ,  डॉ. हर्षवर्धन यांचे खासगी सचिव हार्दिक शाह ,  मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी  ,  प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आ
Image
माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात द्वितीय नवी दिल्ली दि. 29 : माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राने देशभरात द्वितीय क्रमांक पटकावला असून या यशस्वी कामगिरीसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. येथील हयात हॉटेल मध्ये  ‘ माता मृत्यूदर ’  कमी केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम आहे. महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक आहे ,  तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिलेमागे 70 पर्यंत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य दिले होते. केरळ राज्याने हा दर 46 पर्यंत आणलेला आहे. महाराष्ट्र राज्याने हा दर 61 पर्यंत आणला असून तामिळनाडू मध्ये हा दर 68 आहे. डॉ. सावंत पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले ,  माता मृत्यूदरात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचल्याचे समाधान आहे. मात्र हा दर पुढी
Image
पीएमएवाय(ग्रामीण)अंतर्गत राज्यातील अतिरिक्त ७ लाख ९४ हजार घर बांधणीस मंजुरी द्यावी          मुख्यमंत्री फडणवीस  नवी दिल्ली, २९ :  राज्याच्या ग्रामीण भागातील गरीब जनतेला हक्काचे घरे बांधून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)’ अंतर्गत महाराष्ट्राने ठरविलेल्या अतिरिक्त ७ लाख ९४ हजार ३० घरांच्या उदिष्टास चालू आर्थिक वर्षातच मंजुरी देण्याची मागणी, आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना केली. याबाबत श्री. तोमर यांनी सकारात्मकता दर्शवली. कृषी भवन स्थित ग्रामीण विकास मंत्रालयात आज श्री. फडणवीस यांनी श्री. तोमर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), मनरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास   विभागाच्या   सह सचिव   अपराजिता सारंगी ,  मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी , प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यावेळी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  प्रधानमं
Image
दिलखुलास मध्ये   मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला मुंबई ,  दि.  27 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत गुरुवार दि.  28  जून आणि शुक्रवार दि.  29  जून रोजी सकाळी  7.25  ते  7.40  या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत  घेतली आहे.  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात ,  त्यामागचा उद्देश व संकल्पना ,  अभियानाची वैशिष्ट्ये ,  महिलांचे सक्षमीकरण ,  या अभियानाचा फायदा मिळवून घेण्यासाठीचे निकष ,  महिला व तरूणांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ,  या अभियानाबद्दल करण्यात आलेली जनजागृती तसेच  ‘ ऑन अ बॅच ’  ही संकल्पना या विषयांची माहिती श्रीमती आर. विमला यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. ००००
Image
पीक कर्ज वाटप करताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 27 : शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेऊन बँकांनी काम करावे. कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हायब्रीड ॲन्युईटी रस्त्यांच्या कामाबाबत आढावा घेऊन बँकांच्या समस्यांचे निराकरण केले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार आदी यावेळी उपस्थित होते. राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरु झाल्या असून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते घेण्यासाठी वित्तीय सहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप वेळेत झाले पाहिजे. मात्र, बऱ्याच ठिकाणी स्थानिक बँक शाखांकडून यासंदर्भा
Image
एआयआयबी बँकेची  ति सरी वार्षिक बैठक: अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने   नवभारताचा उदय –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबई दि. 26 :  ज्ञानाधा रि त अर्थव्यवस्था ,  सर्वसमावेशक विकास भविष्यकालीन परस्परपुरक असे डि जि टल पायाभूत सुविधा यावर भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून त्यामुळे नवभारताचा उदय होत आहे ,  असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. एशिएन इन्फास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेची (एआयआयबी) तिसरी वार्षिक बैठक येथील एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झाली. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय वित्तमंत्री पीय ु ष गोयल ,  एआयआयबी बँकेचे अध्यक्ष जीन युन यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य त्यासोबतच राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर   राव ,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी  उपस्थित होते. प्रधानमंत्री यावेळी म्हणाले ,   त ी न   वर्षापूर्वी सुरू झालेल्या एआयआयबी बँकेचे  87  सदस्य असून जगभरातील  12  देशांमध्ये चार अब्ज डॉलर गुंतवण ु कीच्या 25  प्रकल्पांना मंज ु री दिलेली आहे. ही चांगली सुरूवात आहे. एआयआयबी बँकेने वित्तीय पुरवठा असाच ठेवत  2