Tuesday, June 5, 2018

निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण' वेबपोर्टलचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय परिषदेने संयुक्तपणे तयार केलेल्या 'निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण' अर्थात सीएमई (कंटिन्यूअस मेडिकल एज्युकेशन) वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात झाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, कार्यकारी सदस्य डॉ. गोपछुडे, डॉ. विंकी रुग्वानी, प्रबंधक संजय देशमुख, उपप्रबंधक सावंत उपस्थित होते.

शासनाच्या डिजीटल क्रांतीच्या अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना या वेबपोर्टलचा लाभ होणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील डॉक्टरांना घरबसल्या किंवा त्यांच्या क्लिनिकमध्ये मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने सीएमई कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे. सराव करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णावर विविध आजारावर योग्य उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर ऑनलाईन माहिती देणार आहेत.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...