Saturday, June 30, 2018

नियोजन अधिकारी- कर्मचा-यांचे उल्लेखनीय कामाबाबत 
जिल्हाधिका-यांकडून कौतुक

अमरावती दि.30: जिल्हा वार्षिक योजनेबाबत प्रलंबित विनियोजन लेख्याबाबतची स्पष्टीकरणात्मक ज्ञापने विशेष मोहिम राबवून निपटारा केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी  जिल्हा नियोजन अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन व कौतुक केले.
 वार्षिक योजनेतील प्रलंबित लेख्याबाबत स्पष्टीकरणे सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार नियोजन कार्यालयाने 2010-11 ते 2015-16 या कालावधीतील  प्रलंबीत विनियोजन लेख्यांचा निपटारा डिसेंबर महिन्यात विशेष मोहिम राबवून पूर्ण केला. या कामगिरीबाबत नियोजन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनीही कार्यालयातील सर्व सहका-यांचे अभिनंदन केले आहे. तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी र. पु. काळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, लेखा अधिकारी वर्षा पुसदकर, संशोधन सहायक बा. रा. तायडे, प्रशांत किटे, श्री. दळवी यांच्यासह सर्व सहका-यांचे कौतुक जिल्हाधिका-यांनी केले. नुकतेच त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दालनात बोलावून त्यांचा गौरव केला.  

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...