मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेटफ्लिक्सच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच
विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी

मुंबई, दि. 8:  ग्लोबल स्टेटअशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ्लिक्सबरोबर काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
मनोरंजन क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या नेटफ्लिक्स माध्यम कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतात विशेषतः महाराष्ट्रात राज्य सरकारबरोबर काम करण्याची तयारी दर्शविली. नेटफ्लिक्सचे जागतिक सार्वजनिक धोरण विभागाचे उपाध्यक्ष  मोनिक मेश, आशिया- पॅसिफिक क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक क्यूयेक यु चाँग, भारताच्या सार्वजनिक धोरण विभागाच्या संचालक अंबिका खुराणा आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट कंपनीला महाराष्ट्राचे आणि मुंबईचे विशेष आकर्षण असून त्यांच्याकडून चार विविध गोष्टींसाठी सहकार्य घेण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. इंटरनेट सुरक्षा, मराठी चित्रपटांचा प्रचार-प्रसार, महाराष्ट्रातील सामाजिक विषय आणि मामीफिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटांचा प्रचार प्रसार करण्यासाठी  या कंपनीचे सहकार्य अपेक्षित आहे. नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट कंपनी ऑस्ट्रेलिया, न्युझीलॅंड शासनाबरोबर काम करत असून आता ते महाराष्ट्र शासनाबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून मराठी चित्रपट आणि या उद्योगाला बळकट करुन त्यांना उत्तम, जागतिक दर्जाचे व्यासपीठ नेटफ्लिक्समुळे उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ़्लिक्सबरोबर काम करणार असल्याचेही शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती