माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत
नेहमीच सकारात्मक विचार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंत्रालयात उद्या विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश
मुंबईदि. १८ : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मकरित्या मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य माथाडीट्रान्सोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
माथाडी कामगारांच्या प्रलंबित विविध मागण्यांबाबत उद्या मंगळवार (दि. १९) मंत्रालयात बैठक घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेच्यावतीने आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबतची तसेच विविध प्रश्नांबाबत माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत नेहमीच सकारात्मक विचार केला आहे. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कामगारमहसूल तसेच गृह विभाग यांची एकत्रित बैठक घेण्यात येईलअसे सांगितले. त्याबाबतचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाना दिले.
यावेळी आमदार प्रसाद लाड, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधवसरचिटणीस तथा आमदार नरेंद्र पाटीलकार्याध्यक्ष गुलाबराव जगतापसरचिटणीस वसंतराव पवारआनंद पाटील, ऋषिकांत शिंदेचंद्रकांत पाटीलगुंगा पाटीलभानुदास इंगुळकर आदींची उपस्थिती होती.  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती