Saturday, June 2, 2018

मुंबई फिनटेक’ फेस्टिव्हलचे उद्घाटन
फिनटेकमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 2 : फिनटेकमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होऊन ग्राम पातळीपर्यंत विकासाला चालना मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते आज येथील हॉटेल ट्रायडेंट मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित मुंबई फिनटेक फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
श्री. फडणवीस म्हणालेमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल होत असून जगाचा चेहरामोहरा बदलत आहे. अर्थकारण झपाट्याने बदलत आहे. खऱ्या अर्थाने डिजीटल युग सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्याने नुकतेच फिनटेक धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टार्ट अप्सची उभारणी होणार आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राला पहिल्या पाच फायनान्शियल  टेक्नॉलॉजी केंद्रामध्ये स्थान मिळेल. पुढील 3 वर्षात महाराष्ट्र राज्य बदलेले असेल. शहरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत आणि श्रीमंतापासून ते गरिब माणसापर्यंत या डिजिटल तंत्राज्ञनाचे फायदे पोहचणार आहेत. खासगी आणि सरकारी कामकाजाचा वेग वाढून त्यात पारदर्शकता येणार आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचे लाभ नक्कीच मिळतील. महाराष्ट्राच्या विकासाबाबत ते म्हणालेपुढील 3 वर्षात या राज्याची वाटचाल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे होईल. बॅकिंग, फायनान्शियल सर्व्हीसेस आणि इन्शुरन्स क्षेत्रातील फिनटेकचे महत्व पाहता मुंबई येथे जागतिक फिनटेक हब’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असे सांगून फिनटेक फेस्टिव्हलला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रारंभी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी प्रास्ताविकातून मुंबई फिनटेक फेस्टिव्हलच्या आयोजनाची माहिती दिली. याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य आणि आंध्रप्रदेश राज्यात फिनटेक सामंजस्य करार करण्यात आला. तसेच फिनटेक यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे केला. फिनटेकबाबत जागृती करण्यासाठी देशातील पुणेहैदराबादबेंगलुरुकोचीनचेन्नईभुवनेश्वरकोलकत्तालखनौदिल्लीजयपूरअहमदाबाद आणि नाशिक या शहरातून फिनटेक यात्रा 7 हजार कि.मी.चा प्रवास करणार आहे.
सुरुवातीला फिनटेक बाबत ग्रेट ब्रिटनचे उपउच्चायुक्त ख्रिसमन सायमनयेस बॅंकेचे चेअरमन डॉ.राणा कपूर, एसबीआय बँकेचे चेअरमन डॉ.रजनीश कुमार, फिनटेकचे वरिष्ठ अधिकारी सोनेडू मोहोंती यांनी डिजीटल इनफ्रास्ट्रक्चर, फिनटेक प्लॅटफॉर्म, डिजीटल इकॉनॉमी, सायबर क्राईम, इकॉनॉमी डिजास्टर, ग्लोबल मार्केट, सायबर सुरक्षा, फिनटेक स्टार्ट अप प्रोग्राम, फिनटेक इन्व्हेसमेंट प्रोग्राम, फिनटेक पॉलीसी, डिजीटल टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल, वाढणारा कामाचा वेग, त्यातील पादर्शकता आणि सोईसुविधा या संदर्भात भाषणातून माहिती दिली.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...