Posts

Showing posts from April, 2021
Image
  टंचाई आराखड्यात प्रस्तावित कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी -     जिल्हाधिकारी शैलेश नवाल     अमरावती , दि. 30 : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.   पाणी टंचाई आराखड्यानुसार 797 गावांत 852 उपाययोजनांसाठी   797 गावांसाठी 13 कोटी 15 लक्ष रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. 159 गावांतील 163 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत टँकरने होणा-या पाणीपुरवठ्यात चिखलदरा तालुक्यातील एकझिरा , लवादा , आकी , सोमारखेडा , मलकापूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुरे या सहा गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात 29 गावांत 15 विंधनविहीरी व 18 खासगी विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 3, भातकुली तालुक्यात 1, मोर्शी तालुक्यात विंधनविहीरी व खासगी विहिरी मिळून सहा , वरुड तालुक्यात एक , चांदूर रेल्वे तालुक्यात 7, अचलपूर तालुक्यात 8 बोअरवेल व एक खासगी विहीर , चिखलदरा तालुक्यात 6 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.   टंचाई आराखड्यात विंधनवि
Image
कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा संस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची  2  वर्षे राहता येणार -  महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर               मुंबई ,  दि.30 : बाल न्याय अधिनियमात  ' बालक '  या संज्ञेसाठी नमूद     वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत     संस्थातून बाहेर पडावे लागू शकणाऱ्या बालकांना सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न ,  वस्त्र ,  निवारा ,  शिक्षण ,  प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.             बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम ,  2015 मधील तरतुदींनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ ,  निराधार ,  संकटग्रस्त व अत्याचारित बालकांना पोलीस ,  स्वयंसेवी संस्था

मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवजात अर्भक ॲम्ब्युलन्स

Image
  आदिवासी भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवजात अर्भक ॲम्ब्युलन्स आरोग्य विभागाकडून निधीला प्रशासकीय मान्यता -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 29 : आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांसाठी नवजात अर्भक ॲम्ब्युलन्स व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यासाठी सुमारे एक कोटी रूपयांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रात नवजात अर्भक वाहिकांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे वाहिका उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनंती केली होती व त्याबाबत वेळोवेळी
Image
प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्याकडून धारणीत कोरोना उपाययोजनांचा आढावा                        अमरावती, दि. 28 : प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी धारणी तालुक्यातील विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरला भेट देऊन कोरोना उपचार व विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. त्रिसूत्रीपालनाबरोबरच स्टीम सप्ताहाची गावोगाव प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.                 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री नवलाखे, मनोहर अभ्यंकर, विस्तार अधिकारी बाबुलाल शिरसाठ आदी उपस्थित होते.   प्रकल्प अधिका-यांनी   आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटर येथील सोयीसुविधांची पाहणी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्यांचे प्रमाण वाढविण्याचे, तसेच कोरोना लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.           त्यांनी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली व   गावामधील कंटेनमेंट झोनचीही पाहणी केली. चिखली आश्रमशाळेतील कोविड सेंटर येथे औषधी साठा, अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ.
Image
  जिल्हाधिकारी व आयुक्तांकडून एसआरपीएफ स्मशानभूमीची पाहणी                अमरावती, दि. 28 : शहरातील हिंदू स्मशानभूमीवरील अतिरिक्त ताण कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागांतील स्मशानभूमीचा विकास करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आज वडाळी येथील एसआरपीएफ स्मशानभूमीची पाहणी केली.      सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नेताम उपस्थित होते. याठिकाणी नविन ओट्यांचे प्रमाण वाढवावे, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली. एकाच भागातील स्मशानभूमीवर ताण येऊ नये यासाठी शहरातील विविध भागातील स्मशानभूमी विकसित करण्यात येत आहेत.   त्यासाठी लागणारे साहित्य, निधी आदी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.       
Image
  अमरावती विभागात आगामी हंगामासाठी आवश्यक व दर्जेदार सोयाबीन बियाणे पुरवठा व्हावा महाबीज व खासगी कंपन्यांना शासन स्तरावरून आदेश व्हावेत -       पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून कॅबिनेटमध्ये मागणी   अमरावती, दि. २८ : अमरावती जिल्ह्यात व विभागात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, आगामी खरीप हंगामात दर्जेदार सोयाबीन बियाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांना निर्देश देण्याची विनंती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेटमध्ये मांडली.   या मागणीचे निवेदनही पालकमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी मंत्री दादाजी भुसे यांना दिले आहे.   अमरावती विभागात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाहता सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनसाठी २.७० लाख हेक्टर   क्षेत्र अपेक्षित असून मागील वर्षी १.२५ लाख क्विंटल बियाण्याची विक्री जिल्ह्यात झाली. त्या अनुषंगाने येत्या हंगामासाठी १.३० लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता
Image
  लक्षणे दिसल्यास तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन     अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना प्रत्येकाने आपली तसेच कुटूंबियांची काळजी अत्यंत आवश्यक झाले आहे. ताप, घसादुखी, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास  अडचण, जिभेची चव जाणे किंवा कुठलाही शारिरीक त्रास आदी लक्षणे दिसल्यास सरकारी अथवा खासगी  रुग्णालयात जाऊन तत्काळ तपासणी करावी. कोरोना संबंधीची आरटीपीसीआर चाचणी करुन घेऊन स्वत:सह  कुटुंबाला व समाजाला संक्रमणापासून वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.     जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. नवाल यांनी नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जि ल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशन,  खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. या  पार्श्वभूमीवर प्रत्येकाने
Image
    ब्रेक द चेन जिल्हाधिका-यांकडून एसडीओ, डीवायएसपी, तहसीलदारांना सूचना नियमांची पायमल्ली करणा-या बेशिस्तांची गय करू नका -जिल्हाधिकारी शैलेश नवाल अमरावती, दि. 28 : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सार्वजनिक हितासाठी घेतलेल्या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियमांची पायमल्ली करणा-या बेशिस्तांची गय करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.             कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर विभागाच्या अधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोविड साथीच्या प्रतिबंधासाठी लागू नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य व इतर विभागांनी समन्वय ठेवून मोहिम राबवावी. फौजदारी प्रक्रिया संहिता व इतर अधिनियमानुसार आतापर्यंत केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांची प

ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कामे करावीत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘टीएचओं’ची बैठक   ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कामे करावीत -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. 27  : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात साथीचे वेळीच नियंत्रण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कामे करावीत,   असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.   जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिका-यांची पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून कामे करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण तपासणी व जनजागृतीसाठी गावोगाव विविध सर्वेक्षणे

गरजूंना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य गरजूंना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ -            पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 27 : कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.   कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा, यासाठी राज्यात सर्वत्र टाळेबंदी तसेच रात्रीच्यावेळी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नुसार सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याकरिता मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येणार