Posts

Showing posts from May, 2020

रूग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोविड वॉर्डाला भेट पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस

Image
            जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.         गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी काल सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता   काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेव

आगामी काळातील नियोजनाबाबत पालकमंत्र्यांकडून निर्देश

Image
कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण    नियोजन करावे -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 30 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व जून महिन्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्ह्यात व अमरावती शहरात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा व पुढील काळातील नियोजन ठरविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की

ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी - गृह मंत्री अनिल देशमुख

Image
गृह मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा • कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा • जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या • आरोग्य सुविधा सज्ज ठेवा   अमरावती, दि. 28 :    कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी यंत्रणांना आवश्यक सामग्री वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेलाही होमगार्ड आदी आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यात येईल. कोरोनाचे ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून विशेष दक्षता घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.       गृह मंत्री श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल

विकास कामांसह रोजगारनिर्मितीला चालना - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुसरा   थोड्या कालावधीत जिल्ह्याची मोठी झेप                अमरावती, दि. 28 : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असताना ग्रामीण नागरिकांना मनरेगातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार आजमितीला जिल्ह्यात 690 गावांतून 3 हजार 120 विविध कामे सुरू असून, 86 हजार 993 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती झाली आहे. मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगातून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात रोजगारनिर्मितीत भरीव वाढ झाली आहे. राज्यात आजमितीला मनरेगा कामांमध्ये भंडारा जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 307 मनुष्यबळ उपस्थिती असून हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातही गत महिनाभरात रोजगारनिर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज सुमारे 86 हजार 993 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती झाली आहे. कोरोना संकटकाळात लॉकडाऊन असताना ग्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग मानसकन्येचा हृद्य सत्कार

Image
गृहमंत्र्यांच्या पुढाकाराने झाले होते 2004 मध्ये लग्न   अमरावती, दि. 28 : वझ्झर येथील दिव्यांग, बेवारस बाल गृहातील एका दिव्यांग भगिनीची जबाबदारी स्वीकारून तिचे लग्न गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने झाले. संसारात सुखी झालेल्या या आपल्या दिव्यांग मानस कन्येचा व जावयाचा हृद्य सत्कार गृह मंत्री यांनी आज अमरावतीत केला. या हृद्य सोहळ्यात उपस्थित सर्वजण यावेळी भारावून गेले होते.   महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बेघर बेवारस दिव्यांग बालगृहात सुशीला ही मुलगी आजीवन पुनर्वसनासाठी दोन वर्षांची असल्यापासून दाखल आहे. ती पुण्याला रेल्वे स्थानकावर सापडली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांनी या बालिकेला वझ्झरच्या आश्रमात आणून दाखल केले व तिचा सांभाळ केला. ती शिक्षित होऊन २१ वर्षांची होताच शंकरबाबा पापळकर यांनी तिचा विवाह वलगाव येथील दिव्यचक्षू अशोक देशमुख यांच्याशी निश्चित केला. गृह मंत्री अनिल देशमुख यांनी या विवाहासाठी

जिल्ह्यातील कॉटन जीनची संख्या 25 वर कापूस खरेदीला वेग देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Image
अमरावती, दि. 27 : कापूस खरेदीला वेग देण्यासाठी 8 खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या 18 वरून 25 पर्यंत वाढली असून त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या दूर करण्यासाठी व कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन निर्देश दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार काही जीन सुरु झाल्यास खरेदीला गती मिळेल. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्यात असे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली.

टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर

Image
किडीच्या नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे कृषि विभागाला निर्देश अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदीचा फडशा पाडते. या किडीचा प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर कृषि विभागाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तत्काळ उपाय करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. काल दि. 26 मे, रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. ते प

खरीप कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Image
पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका -     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर         अमरावती, दि. 26 : बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नये. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागून शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास कठोर कारवाई करू, असा सज्जड इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बँकांना दिला आहे.             अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020-21 करिता किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज वाटप सुरु आहे. त्याकरिता बँका शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. कोरोना संकटामुळे कृषी क्षेत्र आधीच संकटात सापडले आहे. शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी शासन विविध कल्याणकारी निर्णय घेत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भर

शिवनगर, नागपुरी गेट स्‍वॅब सेंटर व शहरी आरोग्‍य केंद्र हैदरपुरा येथे जिल्‍हाधिकारी यांची भेट

Image
 प्रशासन कोरोना योध्‍दांच्‍या पाठीशी - जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल           अमरावती दि.26 : शिवनगर या परिसरात रुग्‍ण आढळत आहे. सदर परिसराची सद्याची स्थितीची पाहण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे, नगरसेवक संजय वानरे यांनी पाहणी केली. शिवनगर परिसरात प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांचा सदर स्‍थळी जावून आढावा घेतला. या परिसरातील नागरीकांची जिल्‍हाधिकारी महोदयांनी संवाद साधला की, नागरिकांनी मास्‍क चा वापर करावा, साबनाने वारंवार हात धुवावे तसेच सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करावे. या परिसरातील नागरिकांना मास्‍क चे वाटप यावेळी त्‍यांनी केले. सदर परिसरातील काही रस्‍ते बॅरिकेट लावून बंद करण्‍याबाबत सुचना दिल्‍या. त्‍या अनुषंगाने सदर रस्‍त्‍यावर बॅरिकेट करण्‍यात आले.   यावेळी सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक धनंजय शिंदे उपस्थित होते.         महानगरपालिका, अमरावती कार्यक्षेत्रातील कोविड-19 बाधीत रुग्‍णाचे सहवासित व संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तीचे स्‍वॅब सँम्‍पल मनपा शाळा, नागपुरी गेट येथील लॅबमध्‍ये घेण्‍यात येते त्‍या लॅब सेंट