परदेशातून आलेल्या नऊ नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण

        परदेशातून जिल्ह्यात आलेल्या सात पुरुष व दोन महिला अशा एकूण नऊजणांचे 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण हॉटेलमध्ये करण्यात येत असून, दक्षतापालनाबाबत हॉटेल व्यवस्थापनाला सूचना देण्यात आल्या आहेत.  

       येथील हॉटेल रंगोली पर्ल, हॉटेल महफिल इन, हॉटेल रॉयल इन येथे या नागरिकांना ठेवण्याबाबत संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांना प्रशासनाकडून पत्र देण्यात आले आहे. हॉटेलमधील वास्तव्याचा खर्च संबंधित नागरिकांकडून करण्यात येईल. सदर प्रवासी रुमच्या बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. रुम व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. अन्न व पाण्याचा वापर डिस्पोजेबल पद्धतीने करावा. कुठलीही अडचण आल्यास आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी संबंधित व्यवस्थापकांना दिले आहेत.

         हे नागरिक इंग्लंड व फिलिपाईन्स या देशांतून परतले आहेत. आंतरराष्ट्रीय पथकांकडून त्यांची वेळोवेळी तपासणी झाली आहे. तथापि, दक्षता म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद आहे.

                                    000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती