अद्याप परतू न शकलेल्या व्यक्तींसाठी निवारा केंद्रात व्यवस्था


संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना परत पाठविण्याचे प्रयत्न होत आहेत. अद्याप परतू न शकलेल्या नागरिकांना व निवासाची सोय नसलेल्या व्यक्तींसाठी शासनाद्वारे निवारा केंद्रातून व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधितांनी तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार, प्रवासी यांना जिल्ह्यामधून इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी बस, ट्रेन आदी वाहने पाठविण्यात येत आहेत. तरीसुद्धा काही मजूर, प्रवासी अद्याप स्वगृही परतू शकले नसतील व त्यांची निवासाची व्यवस्था नसेल तर अशा मजूर, प्रवाश्यांची व्यवस्था निवारा केंद्रांतून करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधितांनी तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                                    000   


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती