Tuesday, May 26, 2020

शिवनगर, नागपुरी गेट स्‍वॅब सेंटर व शहरी आरोग्‍य केंद्र हैदरपुरा येथे जिल्‍हाधिकारी यांची भेट




 प्रशासन कोरोना योध्‍दांच्‍या पाठीशी

- जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल

         अमरावती दि.26 : शिवनगर या परिसरात रुग्‍ण आढळत आहे. सदर परिसराची सद्याची स्थितीची पाहण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे, नगरसेवक संजय वानरे यांनी पाहणी केली. शिवनगर परिसरात प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांचा सदर स्‍थळी जावून आढावा घेतला. या परिसरातील नागरीकांची जिल्‍हाधिकारी महोदयांनी संवाद साधला की, नागरिकांनी मास्‍क चा वापर करावा, साबनाने वारंवार हात धुवावे तसेच सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करावे. या परिसरातील नागरिकांना मास्‍क चे वाटप यावेळी त्‍यांनी केले. सदर परिसरातील काही रस्‍ते बॅरिकेट लावून बंद करण्‍याबाबत सुचना दिल्‍या. त्‍या अनुषंगाने सदर रस्‍त्‍यावर बॅरिकेट करण्‍यात आले.  यावेळी सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक धनंजय शिंदे उपस्थित होते.

        महानगरपालिका, अमरावती कार्यक्षेत्रातील कोविड-19 बाधीत रुग्‍णाचे सहवासित व संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तीचे स्‍वॅब सँम्‍पल मनपा शाळा, नागपुरी गेट येथील लॅबमध्‍ये घेण्‍यात येते त्‍या लॅब सेंटरची पाहणी जिल्‍हाधिकारी महोदयांनी केली. या ठिकाणी नागरिक स्‍वॅब द्यायला आले होते त्‍यांची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी परिचारीका सुशिला दामले, मीनल राऊत, वैशाली बुरनासे यांची विचारपुस करुन त्‍यांना स्‍वतःहाची काळजी घेण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. शासनानी दिलेल्‍या सुचनेचे पालन करावे तसेच आयुष मंत्रालयाने सुचित केलेल्‍या औषधीचा वापर करावा. आपल्‍याला या संकटकाळात काम करण्‍याची संधी मिळाली आहे. आपण खरोखर चांगले काम करत आहात. कोणत्‍याही प्रकारची भिती न बाळगता स्‍वतःहाची व संपुर्ण परिवाराची काळजी घेवून आपल्‍या दिलेले कार्य पुर्ण करा. यावेळी त्‍यांनी सर्व आरोग्‍य कर्मचा-यांना तसेच इतरही कर्मचा-यांना त्‍यांच्‍या कार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्‍त  तौसिफ काझी, डॉ. फिरोज खान, नुर खॉं उपस्थित होते.

        अमरावती महानगरपालिकेचे शहरी आरोग्‍य केंद्र हैदरपुरा येथे जिल्‍हाधिकारी महोदयांनी भेट दिली. या केंद्राची संपुर्ण माहिती डॉ.पुर्णिमा उघडे व परिचारीका अर्चना बावीस्‍कर यांनी दिली. या आरोग्‍य केंद्रा मार्फत माताबाल संगोपन व लसीकरणाचे नियमितपणे काम सुरु आहे. या केंद्रा अंतर्गत ताजनगर तसेच इतरही प्रतिबंधीत क्षेत्र येत असल्‍याने या केंद्राची जबाबदारी ही मोठी आहे. या केंद्रा अंतर्गत येणा-या संपुर्ण परिसराचे आतापर्यंत तिन वेळा सर्वेक्षण झाले असून नागरिक आता सहकार्य करत असल्‍याचे यावेळी माहिती देण्‍यात आली. जिल्‍हाधिकारी महोदयांनी सदर केंद्रावर येणा-या नागरिकांची माहिती जाणून घेतली. या केंद्रा अंतर्गत कोणता भाग येतो तसेच सदर भागात सद्याची स्थिती व त्‍यावर केलेल्‍या उपाययोजना याचा आढावा घेतला. या केंद्रावरील सर्व कर्मचा-यांची त्‍यांनी आपुलकीने विचारपुस केली. मागील अनेक दिवसापासुन या केंद्राचे निरंतर कामकाज सुरु असून येथील कर्मचा-यांच्‍या कामाचे कौतुक त्‍यांनी यावेळी केले.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...