Posts

Showing posts from January, 2019

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन व जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून उद्याचे वैज्ञानिक घडतील - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
             अमरावती, दि. २८ :    विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानविज्ञानाचे महत्व बिंबवून त्यांना शास्त्र व तंत्र अवगत होण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड व विज्ञान प्रदर्शन उपयुक्त आहे. अशा उपक्रमांतून उद्याचे वैज्ञानिक घडतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.     प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण विभागातर्फे अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन व     जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ येथील पी. आर. पोटे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद प्रेक्षागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.   जि. प. शिक्षण सभापती जयंतराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.     जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, माध्यमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, दिलीप निंभोरकर, मुख्याध्यापक संघाचे रवींद्र कोकाटे, पी. आर. पोटे महाविद्यालयाचे प्राचार्य   जी. डी. वाकडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. खेरडे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष गजानन बुरघाटे, श्री. बुरंगे, श्री. चोपडे आदी उपस्थित होते.              श्री. पो
Image
जिल्हा कृषी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ            नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करावे -           पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील -  हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत प्रारंभ - प्रयोगशील शेतक-यांचा गौरव - महोत्सवात मिळणार प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण - नानाविध फळे, फुले व पीकांचे प्रदर्शन - कृषी महाविद्यालयाकडून किचन गार्डनची प्रतिकृती सादर - अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचे अनेक कक्ष अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात शेतीविकासाची मोठी शक्यता लक्षात घेऊन शासनाकडून अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी यंत्रणा व विविध घटकांनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. कृषी विभागातर्फे अमरावती जिल्हा कृषी महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात व हजारो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत प्रारंभ आज येथील सायन्सकोर मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळ
Image
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद कुशल मनुष्यबळासाठी कौशल्याधारित शिक्षणावर भर - शिक्षणमंत्री विनोद तावडे विद्यार्थ्यांना त्यांची आवड लक्षात घेऊन त्या विषयात पारंगत केल्यास ते अधिक परिणामकारपणे व प्रभावीपणे काम करतील. हे लक्षात घेऊन कौशल्याधारित शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर मिलींद चिमोटे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्यासह प्राध्यापकगण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. श्री. तावडे म्हणाले की, राज्यात ‘थ्री इडियटस्’मधल्या घोकंपट्टीवाल्या चतुरलिंगमऐवजी ‘रँचो’ निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त असेल तर रोजगार निश्चित मिळतो. हे लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, संगीत, कला, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात रु