Posts

Showing posts from April, 2019

खड्डे निर्मितीची कामे 15 मेपर्यंत पूर्ण करा - विभागीय आयुक्त पियूष सिंह

Image
33 कोटी वृक्षलागवड अभियान *वृक्ष लागवडीच्या नोंदीसाठी वनविभागाचे पोर्टल कार्यान्वित *  www.mahaforest.gov.in  वन विभागाचे पोर्टल अमरावती, दि. 30 :      33 कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत वृक्ष लागवडीकरीता जागेची सुनिश्चिती, खड्डे खोदून जीओ टॅगींग, उद्दिष्टानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन आदी कामे दिनांक 15 मेपर्यंत पूर्ण करावी, याबाबतची दैनंदिन अद्ययावत माहिती वनविभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष यांनी आज दिले. 33 कोटी वृक्षलागवड अभियान अंतर्गत वृक्ष लागवडीसंबंधी जिल्हानिहाय आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रदीप चव्हाण, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे यांचेसह इतर खात्याचे विभाग प्रमुख, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले की, राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याच्या अनुषंगाने अमरावती विभागाला एकूण 4 कोटी 36 लाख 58 हजार 800 एवढे लक्षांक असून त्याअनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यापैकी सुमारे 1 कोट

मतमोजणी प्रक्रियेसाठी काटेकोर व्यवस्था ठेवावी - जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश

Image
    अमरावती, दि. 30 : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे दि. 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, चोख बंदोबस्त आदी काटेकोर ठेवावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. मतमोजणी संदर्भात पूर्वतयारी आढावा सभा जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, मनोहर कडू, स्नेहल कनिचे, शिरीष नाईक, अनिल टाकसाळे, खर्च सनियंत्रण पथकाचे रवींद्रकुमार लिंगनवाड, आचारसंहिता कक्षाचे संदीप जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांच्यासह सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, मतमोजणीचे काम लक्षात घेऊन सुसज्ज यंत्रणा मतमोजणी केंद्रावर उपलब्ध असावी. या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येईल. मोजणी अधिकारी, सहायक, संगणक सहायक आदी सर्व मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण व सूचना देण्यात याव्यात

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

Image
         अमरावती, दि.30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.             याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रति

टंचाईग्रस्त भागात प्राधान्याने पिण्याचे पाणी पूरविणार जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती ,   दि . 25 :   दुष्काळ ी   तालुक्यात चारा टंचाई व पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष मोठ ् या प्रमाणावर   जाणव ते .     टंचाई काळात   नागरिकांना   पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही , यासाठी प्रशासनाने   नियोजन केले आहे. टंचाईच्या भागात प्राधान्याने पिण्याचे पाणी पुरविणार असल्याची माहिती   जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिल ी . जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई ,   मनरेगा योजना ,   जलयुक्त शिवार   तसेच   33   कोटी वृक्ष लागवड ी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली .   त्यावेळी ते बोलत होते .   मुख्य कार्यकारी अधिकारी म नि षा खत्री ,   निवासी उपजिल्हाधिकारी डॉ .   नितीन व्यवहारे यां च्या सह उपविभागीय अधिकारी ,   तहसीलदार ,   गटविकास अधिकारी तसेच इतर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते . श्री .   नवाल म्हणाले ,   महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजन ें तर्गत जिल्ह्यात विविध कामे सुरु आहेत .   नागरिकांना   किमान एक हजार दिवसा ं चा रोजगार मिळेल याप द्ध तीने सर्व कामांचे नियोजन करावे .   मनरेगा योजने ं तर्गत येणाऱ्या कामांमध्ये जास्तीत जास्त जलव्यवस्थापनाची कामे हाती घेऊन पूर्

अनधिकृत,बोगस,एचटीबीटी,बियाणे,विक्रीबाबत,सावधानतेची,सूचना

अमरावती दि. 24 :  JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉÉSÉÒ ºÉÖ°üú´ÉÉiÉ ½þÉäiÉ +ºÉÚxÉ ¤ÉÒ - ʤɪÉÉhÉä, ®úɺÉɪÉÊxÉEò JÉiÉä, ÊEò]õEòxÉɶÉEäò <iªÉÉnùÒ ÊxÉʴɹ`öÉ ¤ÉÉVÉÉ®úÉiÉ ={ɱɤvÉ ½þÉäiÉ +ɽäþ. +É{ɱªÉÉ ÊVɱ½þªÉÉiÉ JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉɨÉvªÉä EòÉ{ÉÚºÉ Ê{ÉEòÉSÉÒ ±ÉÉMÉ´Éb÷ ¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ ½þÉäiÉä. ªÉäiÉÉ JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉÉiÉ EòÉ{ÉÚºÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSÉÒ JÉ®äúnùÒ Eò®úÒiÉ +ºÉiÉÉÆxÉÉ ºÉiÉEÇò +ºÉhªÉÉSÉÒ MÉ®úVÉú +ɽäþ. MÉ䱪ÉÉ 2 - 3 ´É¹ÉÉǨÉvªÉä iÉhÉÉSÉÉ ½þÉähÉÉ®úÉ jÉɺÉ, ¨ÉVÉÖ®úÉÆSÉÒ ={ɱɤvÉiÉÉ ´É ´ÉÉføiÉÒ ¨ÉVÉÖ®úÒ +ºÉä ´ÉäMÉ´ÉäMɳýªÉÉ +b÷SÉhÉÒ EòÉ{ÉÚºÉ Ê{ÉEòɨÉvªÉä ÊxɨÉÉÇhÉ ZÉɱªÉÉ. ªÉÉSÉ MÉÉä¹]õÒSÉÉ MÉè®ú ¡òɪÉnùÉ PÉä>ðxÉ ú®úÉ>Æðb÷ +{É ¤ÉÒ ]õÒ/BSÉ ]õÒ ¤ÉÒ ]õÒ/¤ÉÒ VÉÒ - 3/iÉhÉÉ´É®úSÉÒ ¤ÉÒ ]õÒ/Ê´Éb÷MÉÉbÇ÷ |ÉEòÉ®úSªÉÉ EòÉ{ÉÚºÉ Ê¤ÉªÉÉhÉäSÉÒ JÉÉVÉMÉÒ ´ªÉCiÉÓ¨ÉÉ¡ÇòiÉ MÉÉ´É{ÉÉiɳýÒ´É®ú PÉ®ú{ÉÉäSÉ Ê´ÉGòÒ ½þÉäiÉ +ºÉ±ªÉÉSÉÒ ¶ÉCªÉiÉÉ xÉÉEòÉ®úiÉÉ ªÉäiÉ xÉɽþÒþ. ½äþ ʤɪÉÉhÉä +xÉÊvÉEÞòiÉ +ºÉÚxÉ, +¶ÉÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSªÉÉ Ê´ÉGòÒ±ÉÉ Eåòpù ¶ÉɺÉxÉÉSªÉÉ VÉxÉÖEòÒªÉ iÉÆjÉYÉÉxÉ ºÉʨÉiÉÒxÉä  (GEAC)  |ÉÊiɤÉÆvÉ PÉÉiɱÉä±ÉÉ +É

बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ग्रंथालय सुविधा

अमरावती, दि. 24 :   अमरावतीच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्रमार्फत अभ्यासिका ग्रंथालय ही योजना राबविण्यात येते. या ग्रंथालयामार्फत विद्यार्थांना   परिक्षेला आवश्यकअसणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. बँकीग, रेल्वे भरती वनविभाग आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती, पोस्ट ऑॅफीस भरती    तलाठी एल.आय.सी.तसेच विविध विभागाच्या विभागीय परिक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी संदर्भातील आवश्यक पुस्तके, वाचन साहित्य ग्रंथालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचप्रमाणे, रोजगार वार्ता, रोजगार, नोकरी संदर्भ, एम्प्लॉयमेंट न्यूज यासह स्पर्धा परीक्षेस आवश्यक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व विविध नियतकालिके उपलब्ध आहेत.  तसेच मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्व   विकास, ताणतणाव व्यवस्थापन, यश मिळवण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तके,    स्वयंरोजगार विषयक पुस्तके आदी विविध साहित्यही   ग्रंथालयात उपलब्ध आहे.                     हे   ग्रंथालय   व अभ्यासिका दुसरा माळा, दत्त पॅलेस, कोल्टरकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती येथे आहे. हे विनामूल्य   ग्रंथालय   कार्य

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन

अमरावती, दि 24 : मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. सर्वप्रथम किडीची ओळख करावी.   किडीची ओळख ही किड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे अळीच्या डोक्यावर पुढच्या बाजुस    अलट  “ y ”    आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेंटवर चौकोनी आकारात ठिपके दिसुन येतात. त्या ठिपक्यावर केसही आढळुन येतात.   या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेत पुर्ण होतो. एक मादी सरासरी 1500 ते 2000 अंडी देऊ शकते. पुंजक्यात घातलेली अंडी घुमटाच्या    आकाराची असून अंडी अवस्था सुमारे दोन ते तीन दिवसाची असते. अळी अवस्था 15 ते 30 दिवस सहावेळा कात टाकुण पुर्ण होते. प्रथम अवस्थेतील अळी आकाराने लहान, रंगाने हिरवी असुन त्यांचे डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या अवस्थेत अळीचे डोके नारंगी रंगाचे होते. तिसऱ्या अवस्थेत अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजुने पांढऱ्या रेषा दिसण्यास सुरुवात होते व अळी तपकीरी रंगाची होते. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या

रस्ते बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल

                         अमरावती दि. 24 : अमरावती शहरातून जाणारा रस्ता पंचवटी इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, बडनेरा या रस्त्याच्या कॉक्रीटकरणाचे काम केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत मंजूर असून ते सुरु करण्यात आलेले आहे. हे काम शहरामधून टप्याटप्याने पुढे नेण्यात येणार आहे.   पंचवटी चौक ते रोशनी हॉटेलपर्यंत उजवी बाजू व इर्विन येथे कॉक्रीटकरणाचे काम सुरु करावयाचे आहे.    यासाठी या रस्त्याच्या उजव्या बाजुची वाहतूक दि. 24 एप्रिल ते 23 मे पर्यंत सहायक पोलीस आयुक्त वाहतूक, अमरावती    यांच्या परवानगीनुसार वाहतूक बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागरिकांना सूचित करण्यात येते की, या कालावधीत एका बाजूने सावकाश काळजीपूर्वक वाहतूक करावी. खापर्डे बगीचा व रेल्वे स्टेशनकडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतूक मर्चुरी टी पॉईंटकडून तात्पुरत्या स्वरुपात वळविण्यात येत आहे. असे सहायक अभियंता यांनी कळविले आहे. 00000

महाराष्ट्रदिनानिमित्त शासकीय सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

Image
मुख्य ध्वजारोहण सोहळा नेहरू स्टेडियमला होणार अमरावती, दि. 24 :    महाराष्ट्र दिनानिमित्त दि. 1 मे रोजी आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.   निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.    मुख्य ध्वजारोहण सोहळा नेहरू स्टेडियमला होणार असून ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभाची काटेकोर तयारी करावी. प्रत्येक विभागाने त्यांना सोपवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. महाराष्ट्र दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यासाठी सर्वांगिण तयारी करावी. महाराष्ट्र दिनी वाहतूक खोळंबा होणार नाही यादृष्टीने सुरळीत व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावर ध्वजारोहणासह प्रभात फे-या आयोजित केल्या जाव्यात. शासकीय कार्यालयांवर रोषणाई केली जावी. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व तरतुदी तपासून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्रदिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वनिता समाज येथे करण्यात येणार आहे. 00000

मतदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

अमरावती, दि. 16 - ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदान करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.   मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदान केंद्रांवर कार्यरत असलेले अधिकारी हे मतदान यंत्रणा कार्यान्वित करतील. ईव्हीएम मशीनवरील आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील अथवा चिन्हासमोरील निळे बटन दाबावयाचे आहे. आपण मत दिलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील किंवा चिन्हासमोरील लाल दिवा पेटेल. प्रिंटर एक मतपावती मुद्रित करेल. त्यावर आपण मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असेल. मतदार ही मतपावती सात सेकंद पाहू शकेल. मुद्रित मतपावती व्हीव्हीपॅट मशिनवरील काचेच्या माध्यमातून पाहता येईल. त्यामुळे आपण दिलेले मत संबंधित उमेदवारालाच मिळाल्याची खातरजमा मतदाराला करता येणार आहे.

फसव्या व्हाटस्अप संदेशामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल

* मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच अमरावती, दि. 16 : मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे बंधनकारक आहे. असे असतानाही नागरिकांची दिशाभूल करणारा एक व्हाटसअप संदेश व्हायरल होत असून, त्याविरुद्ध आचारसंहिता कक्षाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.   ‘मतदार यादीत नाव नसतानाही मतदान करता येते’, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘मतदानाच्या दिवशी फोटो व अन्य ओळखपत्र पुरावा घेऊन मतदान केंद्रावर गेल्यास मतदान करता येते,’  अशी दिशाभूल करणारी माहिती या संदेशात आहे. ती अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच आहे. लोकसभा निवडणूक दि. 18 एप्रिलला असल्याने आता मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही.   मतदान करण्यासाठी अन्य कागदपत्रांचा पर्याय हा  केवळ मतदार यादीत नाव असलेल्यांसाठीच  आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. असे असतानाही अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणे व निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्यात बाधा आणणे ही कृती गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही

जिल्ह्यात भीमजयंती उत्साहात साजरी

Image
      बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जपूया, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया -            जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन अमरावती, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्व समाविष्ट होऊन देशातील प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांच्या विचारांचा हा वसा जपूया व आपणही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, असे आवाहन आज भीमजयंतीनिमित्त जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांना केले आहे.             भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज सर्वत्र प्रशासन, विविध विभाग व कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, समित्या यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काल सायंकाळपासूनच या परिसरात नागरिकांनी भेट द्यायला सु

उस्मानिया मस्जिद येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक

Image
अमरावती, दि. 12 : खापर्डे बगिचा नजीकच्या उस्मानिया मस्जिद येथे स्वीप मोहिमेत आयोजित ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. भारतीय राज्यघटनेने भारतीयांना मतदानाचा हक्क दिला आहे. लोकशाहीला अधिक सक्षम करण्यासाठी घटनेने दिलेल्या हक्कानुसार 1952 पासून लोकसभेची निवडणूक होत आहे.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून सर्वांनी या राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शन व सहभागाने संपूर्ण जिल्ह्यात मतदार जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार हा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून स्वीप मोहिमेच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. ही मोहिम अधिक भक्कम करण्याच्या हेतूने सर्व नागरिकांसह मुस्लिम समाजामध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठ