बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ग्रंथालय सुविधा



अमरावती, दि. 24 : अमरावतीच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्रमार्फत अभ्यासिका ग्रंथालय ही योजना राबविण्यात येते. या ग्रंथालयामार्फत विद्यार्थांना परिक्षेला आवश्यकअसणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात.
बँकीग, रेल्वे भरती वनविभाग आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती, पोस्ट ऑॅफीस भरती  तलाठी एल.आय.सी.तसेच विविध विभागाच्या विभागीय परिक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी संदर्भातील आवश्यक पुस्तके, वाचन साहित्य ग्रंथालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते.
त्याचप्रमाणे, रोजगार वार्ता, रोजगार, नोकरी संदर्भ, एम्प्लॉयमेंट न्यूज यासह स्पर्धा परीक्षेस आवश्यक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व विविध नियतकालिके उपलब्ध आहेत.  तसेच मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, यश मिळवण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तके,  स्वयंरोजगार विषयक पुस्तके आदी विविध साहित्यही ग्रंथालयात उपलब्ध आहे.                 
 हे ग्रंथालय व अभ्यासिका दुसरा माळा, दत्त पॅलेस, कोल्टरकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती येथे आहे. हे विनामूल्य ग्रंथालय कार्यालयीन वेळेत खुले असते. ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना जिल्हा रोजगार व कौशल्य विकास केंद्रातर्फे ग्रंथालय व अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक संचालक (रोजगार) प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती