मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन


अमरावती, दि 24 : मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
सर्वप्रथम किडीची ओळख करावी. किडीची ओळख ही किड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे अळीच्या डोक्यावर पुढच्या बाजुस  अलट “y”   आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेंटवर चौकोनी आकारात ठिपके दिसुन येतात. त्या ठिपक्यावर केसही आढळुन येतात. या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेत पुर्ण होतो. एक मादी सरासरी 1500 ते 2000 अंडी देऊ शकते. पुंजक्यात घातलेली अंडी घुमटाच्या  आकाराची असून अंडी अवस्था सुमारे दोन ते तीन दिवसाची असते. अळी अवस्था 15 ते 30 दिवस सहावेळा कात टाकुण पुर्ण होते.
प्रथम अवस्थेतील अळी आकाराने लहान, रंगाने हिरवी असुन त्यांचे डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या अवस्थेत अळीचे डोके नारंगी रंगाचे होते. तिसऱ्या अवस्थेत अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजुने पांढऱ्या रेषा दिसण्यास सुरुवात होते व अळी तपकीरी रंगाची होते. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर काळे उंचवट्यासारखे  ठिपके  दिसुन येतात. पुर्ण वाढ झालेली अळी 2 ते 8 सेंटीमीटर खालीवर मीनीत जाऊन मातीचे  आवरण करते आणि त्या आवरणात कोषावस्थेत जाते. हा कोष लालसर तपकिरी रंगाचा असुन  वातावरणानुसार कोषावस्था 8 ते 30 दिवसापर्यंत पुर्ण होते. प्रौढ पतंग निशाचर असुन जष्ण व दमट वातावरणात खुपच सक्रीय असतात. नर पंतगामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकीरी  रंगाच्या छटा असुन टोकाला त्रिकोणी पांढरे ठिपके  असतात.  मादीमध्ये समोरचे पंख  नरापेक्षा कमी चिन्हांकीत असुन एकसमान राखाडी तपकिरी रंगाचे असतात. अशाप्रकारे ही लष्करी  अळी आपला जीवनक्रम 30 ते 90 दिवसात पुर्ण करते. ऊस, भात,ज्वारी, गहु, कापूस, सोयाबीन या पिकांवर देखील  या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

किडीच्या व्यवस्थापनाकरीता उपाययोजना
किडग्रस्त पिकाच्या शेतातील खोल नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे  किडीच्या वेगवेगळया अवस्था नष्ट करण्यास मदत होईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीने पंतग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा. पिकावरील अंडीसमूह अळ्या हाताने गाळा करुन नष्ट कराव्यात. टेलनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटसकांची फवारणी करु नये. ऑझेडिरॅक्टीन  1500 पीपीएम किंवा निंबोळी अर्क 5 टक्के 50 मि.ली. प्रती 10 लिटर  पाण्यात मिसळून फवारावे.  ज्र्युमोरीया रिलई किं मेटाऱ्हिझीयम ॲनीसोप्ली या जैवीक किटकनाशकाची 40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. पिक लागवडीपासुन  काढणीपर्यंत दर आठवड्याला पिकांमधील किडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तिव्रता पाहुन आर्थीक नुकसानची पातळी गाठली असल्यासच फक्त रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
वरीलप्रमाणे उपाययोजना करुन मका पिकांवरील अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी बंधु-भगीनींनी एकात्मीक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.   
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती