Posts

Showing posts from November, 2023

विकसित भारत संकल्प यात्रेचा अंजनगाव बारी येथून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ;प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण

Image
  विकसित भारत संकल्प यात्रेचा अंजनगाव बारी येथून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ;प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण अमरावती, दि.30(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम दि. 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शासनाच्या योजनाची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे अंजनगाव बारी ग्रामपंचायत येथून खासदार डॉ. अनिल बोंडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत आज शुभारंभ झाला. ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ कार्यक्रमांतर्गत दुरदृष्य प्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे यावेळी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी अंजनगाव बारी येथील ग्रामस्थांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला दि. 23 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व तालुकास्तरावर प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ हा कार्यक्रमांतर्गत

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

  अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन  अमरावती, दि. 28 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, इर्विन दवाखान्याच्या वार्ड क्रं. 6 समोर सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 50 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, समोरील बाजुस टक्कल, दाढी व मिशीचे केस काळे पांढरे वाढलेले, अंगात फुल बाह्याचा कथ्था रंगाचा शर्ट त्यावर लेबल lance असे इंग्रजीत लिहलेले, निळा पँन्ट, डाव्या पायाचे घोट्याला जुन्या माराचे निशान व पंजा सुजलेला आहे. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष , अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2677001 किंवा पोहेकाँ जुनैद भ्रमणध्वनी क्रं. 9823178186 व पोहेकाँ राजेश भ्रमणध्वनी क्रं. 9923081375 या क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती  यांनी केले आहे. 00000

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती; अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा

Image
  जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती; अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा                अमरावती, दि. 28 (जिमाका):  रसायन निर्मिती कारखान्यांतून अंमली पदार्थाचे उत्पादन होऊ नये यासाठी नियमित तपासणी करून त्याबाबत अहवाल सादर करावा. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थांचा प्रतिबंधासाठी सर्व विभागाने काटेकोर कार्यवाही करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले.             अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक स्वाती भरडे, तहसिलदार डॉ. प्रशांत पडघन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.                   औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या नावाखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये.

जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबरला

  जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबरला              अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे. 00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करा

  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करा               अमरावती, दि. 28 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 14 व्या लॉटरी सायकलमध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे.                 जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर व्यवस्थापन तंत्रज्ञान, प्रक्रीया व पणन सुविधा यांच्या माध्यमातुन समुह पध्दतीने सर्वागीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे पारंपारिक उत्पादन पध्दतीचे आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उदिष्टे आहे.               एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 14 व्या लॉटरी साय

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024 नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे -जिल्हाधिकारी सौरभ कटियार   ^ जिह्यात विविध ठिकाणी विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन ^ विभागीय आयुक्तांकडून निवडणुक कामकाजांचा आढावा            अमरावती, दि. 25 : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. त्यासाठी 17 व 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची अवश्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रात मतदारांच्या नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.          येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष नोंदणी शिबीराची जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी करुन विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिक

रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे

  रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे   अमरावती, दि. 25 (जिमाका) : रब्बी हंगाम सन 2023-24 मध्ये बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा कालवा निरीक्षक अथवा मोजणीदार यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन अमरावती मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पां. आडे यांनी केले आहे.     अमरावती मध्यम प्रकल्प विभागातील उपलब्ध पाणी पुरवठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नमुना 7 दोन प्रतीमध्ये विहित कालावधीमध्ये सादर करावा. पाणी मागणी अर्जाचे कोरे नमुने संबंधित उपविभाग शाखा कार्यालय व उपशाखा कार्यालयातून मोफत पुरविण्यात येत आहेत.     शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेती पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरविण्याचे नियोजन आहे. उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

  आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले   अमरावती, दि. 25 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, परतवाडा मार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी दि. 30 नोव्हेंबर रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी बुधवार दि. 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार   यांनी केले आहे.       प्रशिक्षण कालावधी हा दि. 1 डिसेंबर ते 15 मार्च 2024 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 29 नोव्हेंबर 2023 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार

चांदुर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

  चांदुर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर                अमरावती, दि. 25 (जिमाका):     चांदुर रेल्वे तालुक्यातील पंचायत समिती सातेफळ निर्वाचन गणाचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.   कार्यक्रमानुसार, दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर आहे.       अप

येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

Image
  येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन                 अमरावती, दि. 27 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमाअंतर्गत दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत प्रयेक मतदार संघात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.               मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात माहिती देण्यासाठी महसुल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा सम

‘मिट द प्रेस’: अमरावती श्रमिक पत्रकार संघटनेला पालकमंत्र्यांची भेट

Image
  ‘मिट द प्रेस’: अमरावती श्रमिक पत्रकार संघटनेला पालकमंत्र्यांची भेट अमरावती, दि. 24 (जिमाका): राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवनाला उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी श्रमिक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांशी संवाद साधला. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलास मराठे, उपाध्यक्ष अमोल इंगोले, कोषाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गिरीश शेरेकर, सचिव रवींद्र लाखोडे, कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे, प्रवीण कपिले आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 0000

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न

Image
  पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न अमरावती, दि. 24 (जिमाका) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह’ असे नामकरण उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रशस्त वातानुकुलित हॉल, अद्ययावत साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह आहे.  अधिसभा सभागृहाला भारताचे कृषीमंत्री, शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविणारे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब दे

स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

Image
  स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन   अमरावती, दि. 24 (जिमाका) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचे विमोचन उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.               संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचा विमोचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पत्नी श्रीमती दिपाली मालखेडे, ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचे लेखक डॉ. मनीष गवई, दिनेश सुर्यवंशी तसेच विद्यापीठाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.   पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यार्थी केंद्री धोरण राबविणारे

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Image
  विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   अमरावती, दि.24(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबवित आहे. या मोहिमेंतर्गत शासनाच्या योजनेची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे बोरगाव धर्माळे येथून उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी शुभारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.   अमरावती तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून 'विकसित भारत संकल्प यात्रे'स प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, मुख्य