राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान संपन्न

 राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी

व मतदार जनजागृती अभियान संपन्न

अमरावती, दि. 6 (जिमाका) : मतदार नोंदणी अधिकारी, 038-अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत राम मेघे अभियांत्रिकी येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयीन शिबिर राबवून नवमतदारांपर्यत पोहोचून मतदार नोंदणीचे काम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांचे नियंत्रणात निवडणूक विभागाने सुरू केले आहे.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, अध्यक्षस्थानी प्रो. राम मेघे आभियांत्रिकी महाविद्यालय येथील प्रा. आशिष सायवान, प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली  यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी लोकशाही, निवडणूका व मतदानाचे महत्त्व युवा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व मतदार नोंदणीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत यावेळी अंदाजे 300 च्या वर विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी नमुना 6 ची उचल केली.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुनील रासेकर, नायब तहसीलदार राजू दंडाळे, प्राध्यापक शुभम कदम, प्राध्यापक विजय खंडार, सहायक निवडणूक अधिकारी मनपा अक्षय निलंगे, तलाठी विजय देशमुख, लिपीक दिपक रायबोर्डे आदींनी सहकार्य केले.

*****





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती