पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र सैनिक व विधवा पत्नी यांचा सन्मान

 पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र सैनिक व विधवा पत्नी यांचा सन्मान

 

अमरावती, दि. 24 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर शासनामार्फत स्वातंत्र सैनिक व विधवा पत्नी यांचा सत्कार आणि सन्मान उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते नियोजन भवन येथे आज करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र सैनिक तसेच त्यांचे जोडीदार यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशांच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये केंद्र शासनाचे स्वातंत्र सैनिक मुलायमचंद गणपतलाल जैन यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी श्रीमती इंदिराबाई महादेवराव बरवे, श्रीमती सीताबाई माणिकराव अडसड, श्रीमती कमलाबाई महादेव गुल्हाने, श्रीमती सरलाबाई माणिकराव निर्मळ, श्रीमती कमलवीर प्रकाश बनारसे तसेच श्रीमती सुमित्रादेवी अयोध्याप्रसाद गंगेले यांना मानपत्र, शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री श्री. पाटील यांनी सन्मानित केले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, खासदार रामदास तडस, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार राजकुमार पटेल यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

00000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती