Thursday, November 2, 2023

खनिकर्म विभागाच्या ई- निविदा सुचनेस 8 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

 

खनिकर्म विभागाच्या ई- निविदा सुचनेस 8 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

       अमरावती, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचे कडून सर्व नवीन अर्जदार, निविदाधारक यांना कळविण्यात येते की, अमरावती जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण 44 रेती, वाळूघाटांचे 14 वाळू डेपोसाठी 14 ई-निविदा पध्दतीने निविदा मागविण्याकरिता या कार्यालयाचे दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी अन्वये ई-निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार 14 वाळूडेपोंपैकी मौजे जळगाव मंगरुळ ता. धामणगाव रेल्वे, मौजे चांदूर ढोरे ता. तिवसा व मौजे तलई ता. धारणी येथे 3 किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 11 वाळूडेपोंकरिता 3 किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या नाहीत. करिता मौजे जळगाव मंगरुळ ता. धामणगाव रेल्वे, मौजे चांदूर ढोरे ता. तिवसा, मौजे तलई  ता. धारणी  या  वाळूडेपोच्या व्यतिरिक्त इतर 11 वाळूडेपोंकरिता ई-निविदेस दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खा. शेख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...