जी. एच. रायसोनी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान संपन्न





 

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी

व मतदार जनजागृती अभियान संपन्न

अमरावती, दि. 8 (जिमाका) : मतदार नोंदणी अधिकारी, 038-अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जी. एच. रायसोनी येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणुक आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयीन शिबिर राबवून नवमतदारांपर्यत पोहोचून मतदार नोंदणीचे काम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांचे नियंत्रणात निवडणूक विभागाने सुरू केले आहे.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उप जिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक देशपांडे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी लोकशाही, निवडणूका व मतदानाचे महत्त्व युवा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व मतदार नोंदणीचे आवाहन केले. जी एच रायसोनी महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत यावेळी अंदाजे 700 च्या वर विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी नमुना 6 ची उचल केली.

अध्यक्षस्थानी अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुनील रासेकर, नायब तहसीलदार राजू दंडाळे, सहायक निवडणूक अधिकारी मनपा अक्षय निलंगे, तलाठी विजय देशमुख, लिपीक भारत काबळे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी नितीन भट तर आभार प्रा. स्नेहील जयस्वाल यांनी मानले .

000000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती