Friday, November 17, 2023

अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत 22 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

 अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत

22 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका): दिव्यांग संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याबाबत जिल्हा एकक झाले असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी प्राप्त अर्जाची यादी दिव्यांग विभाग जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती येथे तयार करण्यात आली असून त्यावर मंगळवार, दि. 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत आक्षेप असल्यास तसे आक्षेप नोंदविण्याचे आवाहन अनुकंपा समिती, जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद, अमरावतीमार्फत करण्यात आले आहे.

अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडे अर्ज केलेले स्व. नरेंद्र महादेवराव धांदे यांच्या जागेवर श्रीमती सीमा नरेंद्र धांदे, स्व. आशा तुळसीराम मसराम यांच्या जागेवर अभिजीत विनायक ढिलपे, स्व. शोभा किसनराव गाडबैल यांच्या जागेवर श्रीमती ज्योती चंद्रकांत जयसिंगपुरे, स्व. लक्ष्मण हिरा चौधरी यांच्या जागेवर संजय लक्ष्मण चौधरी, स्व. गजानन वासुदेवराव राऊत यांच्या जागेवर श्रीकृष्ण गजानन राऊत, स्व. चरणदास विश्वनाथ पाटील यांच्या जागेवर संकेत चरणदास पाटील, स्व. प्रशांत विनायकराव देशमुख यांच्या जागेवर श्रीमती हर्षा प्रशांत देशमुख, स्व. प्रभाकर सीताराम साऊतकर यांच्या जागेवर सुरज प्रभाकर साऊतकर, स्व. प्रेमकुमार भगवानजी जवंजाळ यांच्या जागेवर श्रीमती सरिता प्रेमकुमार जवंजाळ, स्व. अरुण रामकृष्ण धांदे यांच्या जागेवर श्रीमती ज्योती अरुण धांदे, स्व. मोतीराम शांताराम ताथोड यांच्या जागेवर सौरभ मोतीराम ताथोड, स्व. नानासाहेब हरिचंद्र वाघ यांच्या जागेवर श्रीमती शारदा नानासाहेब वाघ या व्यक्तींचे अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी जिल्हा समाज कल्याण दिव्यांग विभागाकडे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जावर बुधवार, दि. 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत काही आक्षेप असल्यास तसे आक्षेप नोंदविण्याचे आवाहन अनुकंपा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...