Posts

Showing posts from February, 2022

विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘इर्विन आरोग्य ज्योत’चे प्रकाशन

Image
    विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘ इर्विन आरोग्य ज्योत ’ चे प्रकाशन उत्तम आरोग्य सेवेत महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर -            विभागीय आयुक्त पियुष सिंह अमरावती , दि. 28 : ‘ हेल्थ इंडिकेटर ’ नुसार उत्तम आरोग्य सेवेत महाराष्ट्र राज्य देशात सातत्याने आघाडीवर राहिले आहे. शासकीय आरोग्य सेवेचे त्यात मोठे योगदान आहे. राज्याच्या आरोग्य सेवेने उपचार सुविधांबरोबरच आरोग्य शिक्षणाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे , असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रकाशित ‘ इर्विन आरोग्य ज्योत ’ या पुस्तकाचे प्रकाशन विभागीय आयुक्तांच्या हस्ते बचतभवनात झाले , त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम , डॉ. प्रमोद निरवणे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी , डॉक्टर यावेळी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाला. विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले की , जिल्हा आरोग्य रुग्णालयातर्फे आरोग्य योजना-उपक्रमांची माहिती पुस्तकाद्वारे लोकां

पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरीत करावी - पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

Image
पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची   अंमलबजावणी त्वरीत करावी -           पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर Ø    पाणी टंचाई आढावा बैठकीत दिले निर्देश      अमरावती दि. 28: येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता झपाट्याने वाढेल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी प्रशासनाने पाणी टंचाई    निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मोर्शी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 33 गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता ढोमणे , अनिल उनराखे , मोर्शी पंचायत समिती सभापती विना बोबडे , उपसभापती सोनाली नवले , सदस्य रुपाली पुड , जया कळसकर , माया वानखेडे , सुनिल कडु , भाऊ छापाने , शंकर उईके , मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले , तहसिलदार सागर ढवळे , गटविकास अधिकारी रविंद्र पवार , आदी उपस्थित होते. एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उद्भ

मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर, शेंडगाव विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Image
  मोझरी , वलगाव , कौंडण्यपूर , शेंडगाव विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा आराखड्याद्वारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. 28 :   जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी , संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव , श्री क्षेत्र कौंडण्यपूर व   शेंडगाव येथे विकास आराखड्याद्वारे मोठा निधी उपलब्ध करून देऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना देण्यात आली. आराखड्यातील उर्वरित कामे व नव्याने राबवावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.   विविध विकास आराखड्यांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली , त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे , विभागीय आयुक्त पियुष सिंह , जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.       पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की , आराखड्यातील प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्

‘पीडीएमसी’ रूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

Image
  ‘ पीडीएमसी ’ रूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन गोरगरीब , गरजू रूग्णांसाठी महत्वपूर्ण सुविधा -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. 28 : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिट कार्यान्वित झाले आहे. गोरगरीब व गरजू रूग्णांना हे युनिट उपयुक्त ठरेल. जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल , असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.               डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले , त्यावेळी त्या बोलत होत्या.   श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ,   दिलीप इंगोले , युनिटप्रमुख डॉ. सुनय जी. व्यास , नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. स्वप्नील मोलके , डॉ. निखिल बडनेरकर , डॉ. सौरभ लांडे , डॉ. शुभांगी वर्मा आदी यावेळी उपस्थित होते.   किडनीची कार्यक्षमता अगदी कमी होणे किंवा निकामी झाल्यावर डायलिसिसची गरज भासते. रक्त

जि. प. अध्यक्ष निवासस्थान इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Image
  जि. प. अध्यक्ष निवासस्थान इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन   अमरावती , दि. 28 :   येथे जिल्हा परिषद अध्यक्षांचे   निवासस्थान इमारतीचे भूमीपूजन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. हे काम गुणवत्तापूर्ण , दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   यावेळी   आमदार बळवंतराव वानखडे , जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख ,   उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण ,   जि. प. सभापती सुरेश निमकर ,   बाळासाहेब हिंगणीकर ,   दयाराम काळे ,   पूजा आमले ,   गिरीश कराळे ,   जयंतराव देशमुख ,   अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी ,   कार्यकारी अभियंता विजय वाठ आदी उपस्थित होते.   या कामासाठी 2 कोटी 53 लक्ष रुपये प्रशासकीय मान्यता आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी चोवीस महिन्यांचा आहे. सुमारे 1 हजार 820 चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट आहे. तळमजला 549 चौ. मी. , तर 424 चौ. मी. पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ असेल. 000