Monday, February 14, 2022

जल जिवन मिशन घराघरात पोहचवा - सीईओ अविश्यांत पंडा

 




जल जिवन मिशन जिल्हास्तरीय कार्यशाळा

जल जिवन मिशन घराघरात पोहचवा

-  सीईओ अविश्यांत पंडा

 

 अमरावती, दि. १४ : हर घर नल से जल उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना  शुध्द, नियमीत,पुरेसे व शाश्वत स्वरूपात पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाच्या वतीने सुरु असलेला जल जीवन मिशन कार्यक्रम  गावापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

महाराष्ट्र ग्रामदर्पण संस्थेद्वारे आयोजीत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अमरावती जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामदर्पण संस्था, अमरावती या केंद्र शासन पुरस्कृत मुख्य संसाधन संस्थे द्वारा  जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, जलसुरक्षक, महिला बचत गट प्रतीनीधी यांचे करीता दि. १४ ते१७ फेब्रुवारी २०२२ या कालावधी मध्ये स्थानीक हाॅटेल गौरी इन येथे चार दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

   यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मेघा राऊत, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर,भातकुली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल बोरखडे ,उपस्थित होते.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीराम कुलकर्णी म्हणालेत, येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचात व पाणी पुरवठा स्वच्छता समीतीची देखभाल व दुरुस्तीची महत्त्वाची जबाबदारी असल्याने त्याअनुषंगाने सर्वांनी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. जलजीवन मिशन हि केवळ शासनाची योजना न रहता गावातील प्रत्येक नागरिकांना ती आपली वाटावी याकरीता सर्वांनी सकारात्मक सहभाग घेऊन योजना यशस्वी करावी असे मत संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मेघा राऊत यांनी व्यक्त केले.

या विषयांचे मिळणार प्रशिक्षण

चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरात जल जीवन मिशन ग्रा.पं.मधील नियोजन व संबंधितांच्या जबाबदाऱ्या, पाण्याची गुणवत्ता, देखरेख व सर्वेक्षण, लोकसहभाग , गाव कृती आराखडा, कामाची अंमलबजावणी आदी विषयासह क्षेत्र भेटीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री चावरे यांनी तर प्रास्ताविक व आभार अनुक्रमे सुबोध देशमुख , आशिष किरणापुरे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रीयंका ईसाने, तेजस्विनी राठोड, कवीता देशमुख, रविंद्र देशमुख, सुमीत जनबंधु यांनी अथक प्रयत्न केले.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...