समाजकल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृह कर्मचा-यांच्या मानधनात वाढ

 

समाजकल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृह कर्मचा-यांच्या मानधनात वाढ

अमरावती, दि. 23 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुदानित वसतिगृहे चालविण्यात येतात. या वसतिगृहांमध्ये अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदार या पदांवर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांच्या मानधनात शासनाकडून वाढ करण्यात आली आहे, असे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी सांगितले.

अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात 64, अकोला जिल्ह्यात 51, यवतमाळमध्ये 171, बुलडाण्यात 41 व वाशिम जिल्ह्यात 51 अशी एकूण 372 अनुदानित वसतिगृहे स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येतात. या वसतिगृहांच्या कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झाली आहे. विभागात सुमारे 1 हजार 145 कर्मचा-यांना मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती उपायुक्त श्री. वारे यांनी दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती