Thursday, February 24, 2022

पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन

 

पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे

नागरिकांना आवाहन

 

अमरावती, दि.24: गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

कोणीही शासकीय, निमशासकीय, लोकसेवक तसेच इतर लोकसेवक आपले शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची (रिश्वत) मागणी करीत असल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र कार्यालयाकडे संपर्क करून तक्रार देवू शकता. आपण दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने गोपनीयता राखण्यात येवून संबंधित लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांचे विरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

याव्दारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपण लाचखोरीला कंटाळला असाल व भ्रष्टाचारासंबंधी आपली तक्रार असल्यास आपण पोलीस अधीक्षक, कार्यालय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, परांजपे कॉलनी कॅम्प रोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, या पत्त्यावर प्रत्यक्ष येवून तक्रार नोंदवा, तसेच दुरध्वनी क्रंमाक 0721- 2553055 किंवा टोल फ्रि 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


00000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...