Posts

Showing posts from August, 2023

जिल्हा दक्षता समितीचा अपर जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Image
  जिल्हा दक्षता समितीचा अपर जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा     अमरावती, दि. 31: अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्य व प्रलंबीत प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात समितीची सभा पार पडली.  सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा(शहर) राहुल आठवले, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (ग्रामीण)अर्जुन ठोसरे, शासकीय अभियोक्ता प्रफुल तापडीया, संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे जुलै 2023 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला . तसेच माहे जुलैमध्ये शहरी विभागात एकूण 4 तर ग्रामीण भागात 5 अशा एकुण 9 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे तसेच जिल्हा दक्षता समितीव

अखर्चित निधीचा अहवाल तत्काळ सादर करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजन समितीचा आढावा; अखर्चित निधीचा अहवाल तत्काळ सादर करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार   अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2021 व 2022 या आर्थिक वर्षातील अखर्चित निधी व शिल्लक असलेला निधीचा अहवाल तत्काळ जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करावा. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षातील नियोजनानुसार नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजनेत खर्च व नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी नियोजन भवनातील बैठकीत घेतला, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के यांच्यासह विविध विभाग प्रमुख, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सन 2021 व 2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात आलेली मंजूर कामे, प्राप्त निधी, झालेला खर्च कामांची सद्यस्थिती, उपयोगिता प्रमाणपत्र व निधी शिल्लक असल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण, सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजना सर्वसा

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक

Image
  अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक           अमरावती, दि. 30 : अप्पर वर्धा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन व अनुषंगिक मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून शासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासनस्तरावरील प्रकल्पग्रस्तांच्या दुय्यम प्रमाणपत्रासंदर्भातील मागणी पूर्ण करण्यात आली असून उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसंदर्भात कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.             अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात दि. 19 मे 2023 पासून मोर्शी येथे  आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांच्या दालनात आंदोलनकर्त्यांसोबत विस्तृतरित्या चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनकर्ते तसेच संबंधित अधिकारी यांच्या समवेत दि. 6 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे बैठक पार

‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी विशेष मोहिम; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

  ‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी विशेष मोहिम; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा             अमरावती, दि. 30: महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी पिक पाहणी सप्ताह दि. 3 ते 9 सप्टेंबर कालावधीत विशेष मोहिम राबवित आहे. या सप्ताह कालावधीत धामणगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन धामणगांवचे तहसिलदार प्रदिप शेलार यांनी केले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वत:च्या मोबाईल वरून सातबारावर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.     जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार धामनणगाव तालुक

खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

  खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन     अमरावती, दि. 28: जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे.   कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.            पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : •         पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. •         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल. •         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतक

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा             अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नींना यांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व कागद पत्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवळ यांनी केले आहे. माजी सैनिक, विधवा पत्नींना यांच्या पाल्यांना इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क प्राप्त झाले आहेत व ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयएम,  आयआयटीए, आयआयएमएस तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, अंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक, माजी सैनिक वीर पत्नी यांनी जिल्हा सैनिक अमरावती येथून अर्ज घेऊन सर्व कागद पत्रासह अर्ज सादर करावा. 00000

प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; वाहनचालकांसाठी दि. 30 व 31 ऑगस्टला आरोग्य तपासणी शिबिर

  प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; वाहनचालकांसाठी दि. 30 व 31 ऑगस्टला आरोग्य तपासणी शिबिर   अमरावती, दि. 28: वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्या वतीने दि. 30 व 31  ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वाहन चालकांचे रक्तदाब बीपी,  मधुमेह सुगर,  नेत्र तपासणी व हृदय स्पंदन ईसीजी  इतर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तरी  वाहन चालकांनी आपले आरोग्य तपासणी शिबीरामध्ये करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे.   डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जुना बायपास रोडवरील हॉटेल तंदुरी नाइट्स व लोणी परिसरातील हॉटेल्स व ढाबे या ठिकाणी  रात्री 7 ते 11  या वेळेत  येणाऱ्या वाहन चालकांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीनंतर वाहनचालकात गंभीर दोष आढळल्यास त्याला त्याबाबत शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येईल.   दिवसेंदिवस रस्ते अपघात ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो व्यक्ती रस्ते अपघातात आपला

कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा -         जिल्हाधिकारी सौरभ कटियार               अमरावती , दि. 28 : जिल्ह्यातील भौगोलिक , परंपरागत व्यवसाय व नवीन तंत्रज्ञानाचा आधारे रोजगार व स्वयंरोजगारासाठी मागणी लक्षात घेवून कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करा. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे , असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.             कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविण्यता सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर , समाजकल्याणचे सहायक आयुक्त   माया केदार , कामगार उपायुक्त संगिता गुल्हाणे , संत गाडगेबाबा विद्यापीठचे अंकिता पाडोले , अनिल कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.             ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामस्तरावर प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागाच्य

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबत खेळातही सहभागी व्हा;जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

Image
  तीन दिवसीय व्हॉलीबॉल संमेलनाचा थाटात शुभारंभ ; विद्यार्थ्यांनो , अभ्यासासोबत खेळातही सहभागी व्हा ; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन        देशातील 576 खेळाडूंनी घेतला सहभाग   अमरावती दि. 28 : विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत खेळालाही महत्त्व द्यावे. खेळामुळे आपल्यातील सांघिक वृत्ती वृद्धिंगत होते. समूहात काम केल्यामुळे इतरांच्या विचारांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढते. तसेच खेळामुळे चांगले आरोग्यही लाभते. यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार विविध खेळ प्रकारामध्ये सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.   जवाहर नवोदय विद्यालयाव्दारे आयोजित 31 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलनाचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले , त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. जवाहर नवोदय विद्यालयाचे सहायक आयुक्त व क्लस्टर इंचार्ज डॉ. ए. एस. सावंत ,   अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान , आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनन्या राय , नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंद्र सी.के. , अकोल्याचे प्राचार्य रवींद्र चंदनशिव , सचिन खरात , नितीन शॉरीक , रवींद्र राऊ

रक्तदान चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे - मनपा आयुक्त देविदास पवार

Image
  रक्तदान चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे -          मनपा आयुक्त देविदास पवार रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न             अमरावती, दि. 27 : मानवी शरीरातील रक्त व रक्त घटके ही कोणत्याही कारखान्यात तसेच वनस्पतीपासून निर्माण होत नाही. केवळ मानवी शरीरातून मिळणारे रक्त हेच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कामी पडते. यासाठी सातत्याने रक्तदान शिबीरांच्या आयोजनातून रक्त संकलित होणे आवश्यक आहे. रक्तदानाची ही चळवळ अखंडपणे सुरु राहण्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी आज येथे केले.            जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय रक्तपेढी व रक्तघटक विलगीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सामाजिक न्याय भवनात रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र सोळंके, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील, रक्तपेढी प्रमुख आशिष वाघमारे, रक्त संकलन अधिकारी डॉ. संदेश हेमलवाड, जनसंपर्क अधिकारी मिलींद तायडे तसेच विविध संस्थेचे शिबिर आयोजक आदी यावेळी उपस्थित होते. श्री. पवार