‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी विशेष मोहिम; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

 


‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी विशेष मोहिम; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 30: महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी पिक पाहणी सप्ताह दि. 3 ते 9 सप्टेंबर कालावधीत विशेष मोहिम राबवित आहे. या सप्ताह कालावधीत धामणगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन धामणगांवचे तहसिलदार प्रदिप शेलार यांनी केले आहे.

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वत:च्या मोबाईल वरून सातबारावर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

    जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार धामनणगाव तालुक्यात दि. 3 ते 9 सप्टेंबर 2023 या कालावधीत ई-पीक पाहणी राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये 100 टक्के ई-पीक पाहणी पुर्ण करण्यासाठी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना ई-पीक पाहणी करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच याबाबत महाविद्यालये, ग्रामपंचायत तत्सम शासकीय कार्यालयामध्ये ई-पीक पाहणी प्रशिक्षण व प्रबोधन बाबत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीव्दारे नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. खरीप हंगामासाठी विशेष मोहिम कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. जेणेकरून शासनाच्या पीक विमा, पी. एम. किसान, तारण कर्ज , अतिवृष्टी नुकसान भरपाई, गारपीट नुकसान भरपाई या योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती