परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 14 ऑगस्ट

 

परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी

अर्ज सादर करण्याची मुदत 14 ऑगस्ट

 

अमरावती, दि. 10 (जिमाका): परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विहित नमुन्यात अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी ता. धारणी जि. अमरावती येथे दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन धरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी जे. एन. गाढवे यांनी केले आहे. शिष्यवृत्तीसाठी नमुना अर्ज प्राप्त करुन परिपूर्ण माहिती भरुन व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावा.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी सन 2023-24 या वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

          परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदन पत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता. धारणी जि. अमरावती या कार्यालयात कार्यालयीन वेळेत विनामूल्य उपलब्ध आहेत.

          अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी ता. धारणी जि. अमरावती तसेच अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर उपलब्ध आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती