कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 



कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा

-        जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील भौगोलिक, परंपरागत व्यवसाय व नवीन तंत्रज्ञानाचा आधारे रोजगार व स्वयंरोजगारासाठी मागणी लक्षात घेवून कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करा. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त  माया केदार, कामगार उपायुक्त संगिता गुल्हाणे, संत गाडगेबाबा विद्यापीठचे अंकिता पाडोले, अनिल कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.

            ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामस्तरावर प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे. विविध औद्योगिक संघटना, शासकीय विभाग यांच्या समन्वयाने कौशल्य विकास आराखडा तयार करावा. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य प्रशिक्षणे उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

            महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  नाविन्यपुर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ  उपलब्ध व्हावे यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज ’  राबविण्यात येत असुन महाविद्यालयांनी नोंदणी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी आज येथे केले.

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती