आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युथ फेस्टिव्हल 12 ऑगस्टपासून

 

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त

युथ फेस्टिव्हल 12 ऑगस्टपासून

अमरावती, दि. 10 (जिमाका): आंतरराष्ट्रीय युवा दिन दि. 12 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी नॅको नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्यामार्फत जिल्ह्यांतर्गत विविध स्तरावर युथ फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार आहे. एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करुन रोगप्रतिबंधक उपचार, हिंसा नाही, शुन्य कलंक व भेदभाव, हानी कमी करणे, एचआयव्हीसाठी औषधोपचार ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक व शासकीय पातळीवर जबाबदारी घेऊन जागरुक राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृतीव्दारे आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या सहाकार्याने आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने युथ फेस्टीव्हल सर्वसाधारणपणे दि. 12 ते 30 ऑगस्ट या कालावधीत वय वर्ष 18 ते 25 या वयोगटातील महाविद्यालयीन मुलांसाठी आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावर रीळ मेकींग स्पर्धा, जनजागृती रॅली, बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रीळ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व ई-मेलवर पाठविण्यास विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, अमरावती व संत गाडगेबाबा विद्यापीठअंतर्गत जिल्ह्यातील रेड रिबन महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कार्यरत सर्व केंद्र व अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून प्रो. राम मेघे इंजिनिअरींग कॉलेज बडनेरा अमरावती येथून भव्‍य बाईक रॅलीचे आयोजन दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या बाईक रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी आपल्या बाईक व हेल्मेटसह उपस्थित राहून जनजागृती कार्यक्रमास सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

*****


 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती