Posts

Showing posts from December, 2022

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबर

  जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबर अमरावती, दि. 23 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळाने आपले प्रवेश अर्ज दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. युवा महोत्सवामध्ये जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले यांनी केले आहे. युवा महोत्सवामध्ये यंदा लोकगीत व लोकनृत्याचा समावेश करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकाचे वय 15 ते 29 वर्षापर्यंत असावे. प्रवेश अर्ज सादर करतांना संस्था, मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज, विहित नमुन्यातील ओळखपत्र, आधारकार्ड तसेच जन्मतारखेचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. ओळखपत्र सुस्पष्ट असावे. जिल्हास्तरावरील युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड विभागस्तरावर करण्यात येते. तसेच विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त उमेदवाराची निवड राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी करण्यात येते. यंदाचा

ग्राहक जनजागृती अभियानाला आजपासून सुरुवात

  ग्राहक जनजागृती अभियानाला आजपासून सुरुवात अमरावती, दि. 23 : ग्राहक जनजागृती अभियानांतर्गत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत ग्राहक जनजागृती कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अमरावती कार्यालयात आज ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही.पी. पाटकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष एस.एम. उंटवाले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या शुभांगी कोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्री. पाटकर यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. दि. 25 डिसेंबरपर्यंत शहरी व ग्रामीण भागात चित्ररथ व ध्वनीफितीव्दारे ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच गावपातळीवर हस्तपत्रकांचे वाटप व भित्तीपत्रके लावण्यात येत आहे. जिल्हा सरकारी वकील परिक्षित गणोरकर, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शोएब खान, डॉ. पंजाबराव देशमुख व

आज राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

  आज राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम अमरावती, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, उद्या शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केंद्र शासनामार्फत यंदा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी ‘इफेक्टीव्ह डिस्पोजल ऑफ केसेस इन कंन्झ्युमर कमिशनर्स’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नागरिक/ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखेडे यांनी केले आहे. *****

‘महावितरण’मध्ये वर्ग-३ व ४ संवर्गातील तांत्रिक-अतांत्रिक कामगारांची २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत त्यांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

 ‘महावितरण’मध्ये वर्ग-३ व ४ संवर्गातील तांत्रिक-अतांत्रिक कामगारांची २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत त्यांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. #हिवाळीअधिवेशन२०२२

कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल

 कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. #हिवाळीअधिवेशन२०२२

भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

  भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 22 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकरी बांधवांची नोंदणी करण्यासाठी आता दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार व चांदूर रेल्वे या पाच तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 आहे, त्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.   *****  

थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत प्रलंबित अर्जाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

  थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत प्रलंबित अर्जाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा अमरावती, दि. 22 : महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजनेचे थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच आ योजित करण्यात आली होती. पंचवटी चौकातील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह येथे विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस समाज कल्याण निरीक्षक प्रमोद फुटाणे, शिष्यवृत्ती शाखेचे समाज कल्याण निरीक्षक विशाल कोगदे, आर.जे. महालकर, आर.एन. गरुड, प्रविण मेश्राम, व्ही.आर. तायडे, सह संचालक उच्च शिक्षण कार्यालयाचे श्री. चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे श्री. जयस्वाल तसेच जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. महाआयटीकडून महाविद्यालयांना त्यांचे लॉगीनमध्ये विविध कारणाने प्रलंबीत असलेल्या अवितरीत शिष्यवृत्तीची स्थिती व त्या अनुषंगाने असलेले आक्षेप, त्यावर क

थेट कर्ज योजनेंतर्गत मातंग समाजातील उमेदवारांना कर्जासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  थेट कर्ज योजनेंतर्गत मातंग समाजातील उमेदवारांना कर्जासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन * अर्ज सादर करण्याचा कालावधी 26 डिसेंबर ते 24 जानेवारीपर्यंत अमरावती, दि. 22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेसाठी मातंग समाजातील 12 पोटजातीच्या अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. थेट कर्ज योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 पूर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लक्षपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करावी. स्वत: अर्जदाराने कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा कार्यालय येथे मूळ कागदपत्रांसह दाखल करावे. त्रयस्थ अथवा मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. थेट कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे थेट कर्ज प्रकरणासोबत अर्जदाराचे बँकेचा सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा. जातीचा दाखला, आधारकार्ड, शैक्षणिक दाखला, रेशनकार

महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील ऑनलाईन अर्जाबाबत सूचना

  महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती   प्रवर्गातील ऑनलाईन अर्जाबाबत सूचना * महाविद्यालयांनी नोंद घेण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन अमरावती, दि. 22 : महाडीबीटी प्रणालीवरील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे महा ॲडमिनकडून ऑटो रिजेक्ट झालेले भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज पुनश्च महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल लॉगइनमध्ये परत आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन जिल्हा लॉगइनला परत पाठविण्यात यावे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ‘भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती’ ही योजना राबविण्यात येते.   विहित मुदतीत अर्ज जिल्हा लॉगइन ला पाठविण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त, माया केदार यांनी केले आहे. *****

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावतीत

  मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावतीत अमरावती, दि. 22 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल दि. 23 व 24 डिसेंबर या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर येत आहेत. उद्या शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागपूर येथून अमरावती शासकीय विश्रामगृह, शिवनेरी कॉलनी येथे त्यांचे आगमन होईल. व रात्री तेथे मुक्काम करतील. शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात आयोजित सीमावर्ती जिल्ह्याच्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहतील. बैठकीनंतर दुपारी 2.30 वाजता ते मध्यप्रदेश, भोपाळकडे प्रयाण करतील. *****

अटल भूजल योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण

Image
  अटल भूजल योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण अमरावती, दि. 22 : अटल भूजल योजनेंतर्गत वरुड नगर परिषद सभागृह येथे एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला अटल भूजल योजनेसंबंधीत विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेचे समन्वयक, विषय तज्ज्ञ तसेच समुह संघटक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते. वरीष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभागातील राजीव रावांडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय उपअभियंता सुनील चिंचमलातपूरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील सहायक भूवैज्ञानिक हिमा जोशी, डॉ. केतकी जाधव, कनिष्ठ भूवैज्ञानिक हरिष कठारे, माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रकाश बहादे, कृषी तज्ज्ञ दिनेश खडसे, जल संवर्धन तज्ज्ञ सचिन चव्हाण, यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. *****

ग्राहक जनजागृती चित्ररथ आज मार्गस्थ

  ग्राहक जनजागृती चित्ररथ आज मार्गस्थ अमरावती, दि. 22 : ग्राहक जनजागृती अभियानांतर्गत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत ग्राहक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अमरावती शहरी व ग्रामीण भागात उद्या शुक्रवार, दि. 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत चित्ररथाव्दारे ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयात उद्या 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे ग्राहकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्र. प्रबंधक यांनी केले आहे. *****

राज्यातील सर्वच जातींतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

 राज्यातील सर्वच जातींतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. #हिवाळीअधिवेशन2022

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

 कोयना,धोम,कण्हेर,वीर अशा विविध धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात जमिनी वाटपासंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. #हिवाळीअधिवेशन2022

रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर

  रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर * शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन   अमरावती, दि. 21 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे. पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग ला

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन उत्साहात साजरा

Image
  राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन उत्साहात साजरा अमरावती, दि. 21 : अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह दि. 14 ते 20 डिसेंबर 2022 या दरम्यान अमरावती विभागात साजरा करण्यात आला. ऊर्जा संवर्धनाबाबत नागरिकांचा सहभाग व जनजागृती तसेच भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबाबत जनतेमध्ये जागृती करणे तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धन रथाला हिरवी झेंडी दाखवून ऊर्जा संवर्धन रथ जनजागृतीसाठी मार्गस्थ करण्यात आला. ऊर्जा संवर्धन जागृती कार्यक्रमांतर्गत महाऊर्जा व ग्रीनगेज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. ऊर्जा संवर्धन जनजागृती कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी तसच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. *****

जुनी निवृत्तीवेतन योजना, या योजनेमुळे राज्यावर येणारा बोजा, शाळांना देण्यात येणारे अनुदान यासंदर्भात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली

जुनी निवृत्तीवेतन योजना, या योजनेमुळे राज्यावर येणारा बोजा, शाळांना देण्यात येणारे अनुदान यासंदर्भात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. शिकविण्याकरिता शिक्षण ही संकल्पना स्वीकारावी लागेल- उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन #हिवाळीअधिवेशन2022

लोकराज्य दालनाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

  हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानभवन परिसरात लावलेल्या #लोकराज्य दालनाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. शासनाचे निर्णय व समाजपरिवर्तनाचे विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘लोकराज्य’च्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.   #हिवाळीअधिवेशन2022

रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर

  रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर * शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन   अमरावती, दि. 21 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे. पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग ला

मध्यप्रदेश राज्यपाल मंगूभाई पटेल यांचा दोन दिवसीय अमरावती दौरा

  मध्यप्रदेश राज्यपाल मंगूभाई पटेल यांचा दोन दिवसीय अमरावती दौरा अमरावती, दि. 20 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल दि. 23 व 24 डिसेंबर या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी नागपूर येथून सायंकाळी 6.30 वाजता   अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन व रात्री मुक्काम. शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथून डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे प्रयाण. सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आगमन व   सीमावर्ती जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीला उपस्थित. दुपारी 2.30 वाजता मध्यप्रदेश, भोपाळकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. ***

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अमरावती दौरा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अमरावती दौरा अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 8.15 वाजता राजभवन नागपूर येथून कारंजा घाडगेकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता कारंजा घाडगे विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता कारंजा घाडगे येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1.15 वाजेपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे   मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्यासह सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठकीला उपस्थित. बैठकीनंतर दुपारी 2 वाजता कारंजा घाडगेमार्गे नागपूरला प्रयाण करतील. *****

‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर * अभियानात जिल्ह्यातील नेरपिंगळाई, खोलाड व चंद्रभागा नदीचा समावेश अमरावती, दि. 19 : नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे. आपल्या भागातील नद्या जिवंत व प्रवाही राहाव्यात, त्यावर आधारित शेती व उद्योगव्यवसाय यांच्या बळकटीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ चला जाणूया नदीला’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समितीचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, अभियानाचे सदस्य सचिव, उपवन विभागीय अधिकारी लीना आदे, जलसं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी विधानसभेत दिली. सर्वांनी मिळून सीमावासियांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. #हिवाळीअधिवेशन2022

मेळघाटातील 317 गावांमध्ये कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीसाठी ॲक्शन प्लॅन

Image
मेळघाटातील 317 गावांमध्ये कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीसाठी ॲक्शन प्लॅन * 6 हजार 745 उपक्रमांचे नियोजन   अमरावती, दि. 16 : मेळघाटातील गावांचा विकास, रोजगार व आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी समान निधी देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती धारणी व चिखलदऱ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत मेळघाटातील 116 ग्रामपंचायतींमधील 317 गावांसाठी 6 हजार 745 उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यात बांधकामांसह कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. गावांच्या गरजा लक्षात घेऊन ॲक्शन प्लॅन अंतर्गत दोन्ही तालुक्यांसाठी 13 कोटी 70 लाखांचा तरतूद करण्यात आली आहे. मेळघाटातील पंचायत समिती धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यांना दरवर्षी पेसा कायद्यांतर्गत निधी दिला जातो. परंतु दरवर्षी हा निधी बांधकामावरच खर्च होतो. या आर्थिक वर्षात बांधकाम, गावांचा विकास, रोजगार व आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी समान निधीचे नियोजन करुन ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या संबंधीचा आराखडा ग्रामसभांमध्ये तयार करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात

ग्रामपंचायतींचे कर वसुली शिबिर 31 जानेवारीपर्यंत सुरु मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरण्याचे आवाहन

Image
  ग्रामपंचायतींचे कर वसुली शिबिर 31 जानेवारीपर्यंत सुरु   मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरण्याचे आवाहन   अमरावती, दि. 16 : जिल्हा परिषदेमार्फत 841 ग्रामपंचायतींमध्ये 31 जानेवारी 2023 पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरावा, यासाठी वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी तसेच खातेदारांनी ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरुन वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी कर व मालमत्ता कर वसुली शिबिर विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी) पथक प्रमुख तथा ग्रामपंचायत सचिव असे गट नेमून 841 ग्रामपंचायतींसाठी तारीखनिहाय कर वसुली शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. शंभर टक्के कर वसूली होण्याच्या दृष्टीने वसुली शिबिर लावण्यात आले असून येथे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली सुर असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. ***

पशुपालकांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत - पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

  पशुपालकांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत -    पशुसंवर्धन विभागाचे आवाहन अमरावती, दि. 14 : ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन योजना राबविण्यात येतात. त्यासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पशुपालक व शेतकरी बांधवांनी दि. 11 जानेवारीपूर्वी अर्ज करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. विभागाने जिल्हा कार्यालयांतही अद्ययावत संगणक प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी प्रतीक्षायादी तयार करण्यात आली आहे. ही यादी अर्ज केल्याच्या वर्षापासून पुढील 5 वर्षापर्यंत लागू असते. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हेही तपासता येणे शक्य झाल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करणे पशुपालक बांधवांना शक्य होणार आहे. त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय

व्याघ्र संरक्षण उद्दिष्टपूर्तीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल

  व्याघ्र संरक्षण उद्दिष्टपूर्तीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल अमरावती, दि. 14 : उपलब्ध मनुष्यबळाचा नियोजनपूर्वक वापर व संवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त यामुळे व्याघ्र संरक्षणाबाबतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात आघाडीवरील प्रकल्प ठरला आहे.   विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचा-यांचे सहकार्य व वाईल्डलाईफ क्राईम सेलची गतिमान अन्वेषण कार्यवाही यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी अपेक्षित उद्दिष्ट्यपूर्ती शक्य होत आहे. ‘मॉनटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स- इंटेसिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस’द्वारे (एमएसटीआरआयपीईएस) निर्धारित निकष पूर्ण करणा-या प्रकल्पात मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे, असे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार यांनी सांगितले. विशेष व्याघ्र संरक्षण दलाची कामगिरी विशेष व्याघ्र संरक्षण दलात सहायक वन संरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वननिरीक्षक यांची एकूण 112 पदे आहेत. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एकूण तीन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत वनक्षेत्रपालांच्या अखत्यारीत 27 वनरक्षक व 9 वननिरीक्षक आहेत. गुगामल वन्यजीवन विभाग, परत

राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात

  राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात   अमरावती, दि. 14 : अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धन करणे या बाबींना प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणमार्फत (महाऊर्जा ) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सप्ताह 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पारंपारिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमित असल्याने सद्यस्थितीत ऊर्जा बचतीशिवाय पर्याय नाही. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवून ऊर्जा संवर्धन करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच भविष्यातील ऊर्जा संकटाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून ऊर्जा बचत संबंधीचे संदेश जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे. जगभरातील हरितवायू उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी भारत प्रमुख देश म्हणून गणला जातो. भारताने पॅरिस वैश्विक हवामान ब

ग्रामपंचायत मतदारांना भरपगारी सुटी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

  ग्रामपंचायत मतदारांना भरपगारी सुटी   जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश   अमरावती, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यातील 257 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी मतदान रविवार, दि. 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटीची विशेष सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. या ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत सावंगी संगम, नांदगाव खेडेश्वर तालुक्यामधील ग्रामपंचायत चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील ग्रामपंचायत डवरगाव, मोर्शी तालुक्यामधील ग्रामपंचायत बेलोणा तसेच दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सांगवा बु. या पाच तालुक्यातील पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने त्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित 252 ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.             मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्यागिक उपक्रम तसेच इ

सरळसेवा भरतीसाठी बिंदूनामावल्यांचे काम युद्धपातळीवर मागासवर्ग कक्षातील अधिकारी- कर्मचा-यांकडून कार्यवाही

  सरळसेवा भरतीसाठी बिंदूनामावल्यांचे काम युद्धपातळीवर मागासवर्ग कक्षातील अधिकारी- कर्मचा-यांकडून कार्यवाही   अमरावती, दि. 13   : शासनाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षात बिंदूनामावली प्रमाणित करण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. विभागातील सर्व जिल्ह्यांतील सर्व शासकीय कार्यालयांतील भरावयाच्या पदांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे कार्यालयप्रमुखांकडून बिंदूनामावली प्रमाणित करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले. कामाची तातडी लक्षात घेऊन बिंदूनामावली प्रमाणित करण्याचे काम युध्दपातळीवर राबविण्यात आले. मागासवर्ग कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांनी अहोरात्र काम करून बिंदूनामावली प्रमाणीकरणाला प्राधान्य दिल्याने भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, वन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महापालिका, नगरपरिषदा, महामंडळे, महावितरण व इतर अनेक कार्यालयांतील गट क व गट

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा नियोजनानुसार विकासकामे वेळेत पूर्ण करावी - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा नियोजनानुसार विकासकामे वेळेत पूर्ण करावी - जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 13 :   विकासकामांसाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असल्याने वेळेत निधी खर्च होण्यासाठी   व नियोजित विकासकामे पूर्णत्वास जाण्यासाठी ‘मिशनमोड’वर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी   बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 2022-23 या वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत 350 कोटी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद आहे. त्यानुसार नियोजित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कामे तत्काळ पूर्ण करून कामांना चालना द्यावी. जो निधी खर्ची पडणार नाही, त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. नियोजनानुसार कृषी, ग्रामविकास योजना, ग्रामसडक योजनेची कामे प्