अटल भूजल योजनेअंतर्गत कार्यशाळेत 66 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

 



अटल भूजल योजनेअंतर्गत कार्यशाळेत 66 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

अमरावती,दि. 1 : केंद्र शासन व जागतिक बँकेतर्फेराबविण्यात येणा-या  अटल भूजल योजनेंतर्गत ‘जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी’ या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. पंजाबरावदेशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत झाला. त्यात 66प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.   

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याहस्ते कार्यशाळेचा शुभारंभ झाला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,एसडीओ  नितीन हिंगोले, योजनेचे पालकअधिकारी डॉ.चंद्रकांत भोयर, कृषी उपसंचालक किसनराव मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षाभाकरे, उपमुख्य कार्य अधिकारी मधुकर वासनिक, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड उपस्थित होते.  

भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजलपातळीत होणारीघसरण थांबविण्यासाठी अटल भूजल योजना राबवली जाते. गावांमध्ये पाणी बचतीच्याउपाययोजना, जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना व त्याला जोडून मनरेगा,प्रधानमंत्रीकृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनकार्यक्रम, जलसंधारण, रोहयो  आदी योजनांचे अभिसरण याद्वारे होत आहे. भूजल गुणवत्तासुधारणे किंवा अबाधित राखणे हाही योजनेचा उद्देश असल्याचे संजय कराड यांनी सांगितले.

भूजल पुनर्भरण, रोजगारहमी योजना, विहिर पुनर्भरण,शोषखड्डेयांची कामे प्राधान्याने राबविणे, भूजलाच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा व ग्रामपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिकअवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणाआणणे व सर्व बागायती क्षेत्रात 100 टक्के ठिबक व तुषार सिंचनाखाली आणणे आदीबाबत डॉ. भोयर यांनी सादरीकरण केले. श्री. मुळे,श्री. वासनिक, विषय तज्ज्ञ प्रकाश बहादे यांनीही मार्गदर्शन केले.

डॉ. केतकी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. हरिषकठारे यांनी आभार मानले. भूवैज्ञानिक हिमा जोशी, प्रतीकचिंचमलातपुरे, दिनेश खडसे, सचिन चव्हाण, प्रफुल्लराठोड, गणेश वडगावकर, जी. एस. कदम यांनी कार्यशाळेच्यायशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

 

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती