Friday, December 23, 2022

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबर

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी

होण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबर

अमरावती, दि. 23 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळाने आपले प्रवेश अर्ज दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. युवा महोत्सवामध्ये जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले यांनी केले आहे.

युवा महोत्सवामध्ये यंदा लोकगीत व लोकनृत्याचा समावेश करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकाचे वय 15 ते 29 वर्षापर्यंत असावे. प्रवेश अर्ज सादर करतांना संस्था, मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज, विहित नमुन्यातील ओळखपत्र, आधारकार्ड तसेच जन्मतारखेचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. ओळखपत्र सुस्पष्ट असावे.

जिल्हास्तरावरील युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड विभागस्तरावर करण्यात येते. तसेच विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त उमेदवाराची निवड राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी करण्यात येते. यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत हुबळी (धारवाड) कर्नाटक येथे आयोजित करण्यात येणार आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...