Friday, December 23, 2022

आज राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

 

आज राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

अमरावती, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, उद्या शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केंद्र शासनामार्फत यंदा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी ‘इफेक्टीव्ह डिस्पोजल ऑफ केसेस इन कंन्झ्युमर कमिशनर्स’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नागरिक/ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखेडे यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...