Posts

Showing posts from January, 2024

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 2 व 3 फेब्रुवारीला प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरोग्य तपासणी

  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 2 व 3 फेब्रुवारीला प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरोग्य तपासणी अमरावती, दि. 31 (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऑटो रिक्षा व स्कूल बस वाहन चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता होणार आहे. या शिबीराचा वाहनचालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे. शिबीरामध्ये ऑटो रिक्षा व स्कूल बस वाहन चालकांचे रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी व हृद्य स्पंदन इतर बाबींची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहे.  तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीनंतर वाहन चालकात गंभीर दोष आढळल्यास त्यांना शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात येईल. दिवसेंदिवस रस्ते अपघात ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो व्यक्ती रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहे. तर कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते अशा व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबांना आर्थिक

राष्ट्रीय व्यवसाय आराखड्यानुसार सर्व संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमास सुरुवात

  राष्ट्रीय व्यवसाय आराखड्यानुसार सर्व संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमास सुरुवात अमरावती, दि. 31 (जिमाका): भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रमाऐवजी राष्ट्रीय व्यवसाय आराखडयाप्रमाणे नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2024-25 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानअुषंगाने येणाऱ्या सत्रापासून इयत्ता 11 वी करिता सर्व संस्था मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. राजेश शेळके यांनी दिली. बदलत्या तंत्रज्ञानामुळे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क(NSQF) विकसित केले आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून शासकीय, अशासकीय अनुदानित, कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये सुरू असलेले द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रम बंद करून राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि सुधारित नवीन अभ्यासक्रम निवडण्याची मुभा संबंधित महाविद्यालय व्यवस्थापनांना राहील. व्यव

कुष्ठरोग जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

  कुष्ठरोग जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी             अमरावती, दि. 30 (जिमाका): सर्वसामान्य नागरीकांना कुष्ठरोगाची माहीती व्हावी तसेच त्यांच्या मनात असलेली भिती व गैरसमज दूर करण्यासाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) व वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक यांचे संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.  या रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवुन मार्गस्थ केले. जागतीक कुष्ठरोग निवारण दिवस 30 जानेवारी रोजी देशभर साजरा केला जातो. तसेच दि. 30 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी, 2024 या पंधरवाडामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामिण, मनपा व शहरी कार्यक्षेत्रामध्ये कुष्ठरोग विषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या अभियानाचा शुभारंभ भव्य जनजागृती रॅलीव्दारे आज झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, निवासी बाहय संपर्क अधिकारी डॉ. हेडावू, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुभाष ढोले, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रमेश बनसोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुनम मोहोकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनंती

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

Image
  अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन               अमरावती, दि. 30 (जिमाका): सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह गजानन महाराज मंदिरासमोर पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतकाचे अंदाजे वय 35 वर्षे असून मृतकाचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे केस काळे, दाडी मीशी वाढलेली, अंगात हाफ बाहीची पांढरे रंगाची फिक्कट गुलाबी रंगाची पटेृ असलेली टी शर्ट, ग्रे रंगाचा लोअर कथीया रंगाची अंडर विअर  पांढरे रंगाचे फुल असलेली, उजव्या हातावर रवि नाव गोंदलेले, तसेच उजवे हाताचे पंजाचे मागे आई नाव गोंदलेले आहे.            मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001  किंवा  वपोनी विजय वाकसे  भ्रमणध्वनी क्रं. 9923252696 किंवा पोहेकॉ एम जुनेद  9823178186 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) यांनी केले आहे. 00000

अमरावती (ग्रामीण) तालुक्यातील मौजे देवरा येथे नवीन रास्त भाव दुकान संस्थांकडून 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

  अमरावती (ग्रामीण) तालुक्यातील मौजे देवरा येथे नवीन रास्त भाव दुकान संस्थांकडून 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित अमरावती, दि. 30 (जिमाका): अमरावती ग्रामीण तालुक्यातील मौजे देवरा येथे नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक संस्था व गटांनी 15 फेब्रुवारीपूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे. निवडीचा प्राथम्यक्रम              नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल. याच प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदयाव्दारे करणे आवश्यक राहिल. अर्जाची प्रक्रिया              इच्छुक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल   कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

Image
  अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन                   अमरावती, दि. 29 (जिमाका):   सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह वार्ड न.6 येथे सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय    ते 60 वर्षे असून मृतकाचा रंग सावळा दोन्ही डोळे उघडे, केस काळे वाढलेले दाडी काळी पांढरी, डोक्याचे केस पांढरे, कमरेला करदोळा, उजव्या हातावर गोंदलेले अस्पष्ट, अंगावर दुपटृा व ब्लॉकेट आहे.             मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास   पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001     किंवा      विजयकुमार वाकसे     भ्रमणध्वनी क्रं. 9923252696 किंवा पो.हे.कॉ. जुनेद खान 9823178186 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) यांनी केले आहे. 00000

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

Image
  अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन                   अमरावती, दि. 29 (जिमाका):  सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह बन्सोड प्लाझा, बस स्टॅड रोड येथे सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 56 ते 60 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे केस पांढरे वाढलेले दाडी व मिशी पांढरी आहे. अंगात काळया रंगाची फुल बाहीची टि शर्ट कथीया, रंगाचे लोअर, रंग निमगोरा हातावर मंगेश असे लिहीलेले आहे.             मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास  पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001    किंवा    पोहेकॉ संजय धोटे    भ्रमणध्वनी क्रं. 9823054812 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) यांनी केले आहे.   00000

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान; पंधरवाडा कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम

  स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान; पंधरवाडा कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम   अमरावती, दि. 29 (जिमाका):  केंद्रीय कुष्ठरोग विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाडा कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.   अभियान कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करुन व्याख्यान, कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञा, कुष्ठरोगाबाबत प्रश्नोत्तरे, कुष्ठबाधित व्यक्तींचा सत्कार    करण्यात येईल. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञाचे वाचन होईल. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांमध्ये अभियान कालावधीमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाटय, रॅली तसेच जिल्हास्तरीय मॅरेथॉन, आरोग्य मेळावे असे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवा कुष्ठरोग जिल्हा केंद्रीय पथक डॉ. पू

समाज माध्यमांवरील सामाजिक न्याय विभागाच्या निविदाबाबतचे संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

  समाज माध्यमांवरील सामाजिक न्याय विभागाच्या निविदाबाबतचे संदेश चूकीचा ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन   अमरावती, दि. 29 (जिमाका):    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याकरीता माहिती पुस्तीका व विविध योजनाचे फार्म प्रिंटीग करुन पुरविण्याबाबचे बनावट निविदा, आदेश विविध समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई तथा समाजकल्याण, अमरावती यांचेमार्फत अशा कोणत्याही प्रकारच्या निविदा किंवा आदेश काढण्यात आलेले नाही. तसेच प्रेसनोट प्रसिद्दीला देण्यात आली नाही.  त्यामुळे समाज माध्यमावर प्रसारीत होत असलेले संदेश आणि अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये ,   असे आवाहन समाजकल्याणचे  सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. 000000

केंद्र शासनाच्या विविध योजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; शासकीय यंत्रणानी मिशन मोडवर काम करा- जिल्हाधिकार सौरभ कटियार

Image
 केंद्र शासनाच्या विविध योजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; शासकीय यंत्रणानी मिशन मोडवर काम करा- जिल्हाधिकार सौरभ कटियार अमरावती, दि. 29 (जिमाका):  केंद्र शासनाव्दारे समाजातील सर्व घटकासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत  पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे केंद्र शासनाच्या विविध योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पंकज कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, नगरपालिकाचे जिल्हा प्रशासन अधिकारी सुमेश अलोणे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.   श्री. कटियार म्हणाले की, पारंपारीक कारागिर आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उद्योगासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबवित आहे. या योजनेचा जिल्

भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
  भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण     अमरावती, दि. 26 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय यांनी पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी विभागीय आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती पांडेय यांनी यावेळी केले.              जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर, मनपा आयुक्त देविदास पवार आदी यावेळी उपस्थित होत

भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Image
  भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण अमरावती, दि. 26 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे,   निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, तहसीलदार विजय लोखंडे तसेच अधिकारी   व कर्मचारी आदी उपस्थित होते. 00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23; क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावलीनुसार अर्ज आमंत्रित

  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23; क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावलीनुसार अर्ज आमंत्रित   अमरावती, दि. 25 (जिमाका): शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार इक्वेस्ट्रियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलियर्डस् अॅण्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला आणि जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स, अॅक्रोबॅटिक्स या खेळांचा समावेश करण्यात आले आहे. या खेळासाठी सुधारीत नियमावलीनुसार दि. 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.   सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४च्या शासन निर्णयानुसार सुधारणा के

पशुधनाची ऑनलाईन टॅगिंग व नोंदणी झाली सुलभ; नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी करा

  पशुधनाची ऑनलाईन टॅगिंग व नोंदणी झाली सुलभ; नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी करा               अमरावती, दि. 25 (जिमाका): शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी जनावरांचे   टॅगिंग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाची नोंदणी व   टॅगिंग करणे आता सुलभ झाले असून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून पशुधनाची टॅगिंग व नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहे.               दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देय आहे. अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्र पशुधनास कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रीया सुरू आहे. या पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी पशुपालकांचे उत्स्फूर्त प्रसिसाद मिळत असून आज अखेर पशुधन नोंदणी 5.73 लक्ष, पशुपालक नोंदणी 1.96 लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी 3.20लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल 1.84 लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी 5 हजार 795, पशुपालक

जिल्हास्तरीय भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जरूड ग्रामपंचायत प्रथम

  जिल्हास्तरीय भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जरूड ग्रामपंचायत प्रथम         अमरावती, दि. 25 (जिमाका) : अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक जरुड ता.वरुड, द्वितीय क्रमांक झटामझरी ता.वरुड तर तृतीय क्रमांक अंबाळा ता. मोर्शी यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी दिली.   अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार, मोर्शी व वरुड तालुक्यातील एकूण 93 ग्रामपंचायती अटल भूजल योजनेत समाविष्ट आहे. त्यातील सन 2022-23 मध्ये 27 ग्रामपंचायतीने भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये तीन ग्रामपंचायतींची निवड झाली असून प्रथम क्रमांक जरुड ता.वरुड 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांक झटामझरी ता.वरुड 30 लाख   रुपये तर तृतीय क्रमांक अंबाळा ता. मोर्शी 20 लाख रुपये पारितोषीक जाहिर झाले आहे.                लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठ

आधारभुत किंमतीप्रमाणे सोयाबिन व कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

  आधारभुत किंमतीप्रमाणे सोयाबिन व कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 25 (जिमाका) :   शासकीय किमान आधारभूत किंमतीप्रमाणे सोयाबीन व कापूस   खरेदी केंद्र सुरु असून शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.                आधारभूत किंमतीप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये कॉटन कॉपोरेशन ऑफ इंडियाव्दारे येवदा ता.दर्यापूर व भातकुली येथे कापूस खरेदी केंद्र सुरु असून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. कॉटन फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील चार तालुक्यात धामणगाव रेल्वे, चांदुर बाजार, वरुड व दर्यापूर या ठीकाणी कापूस खरेदी केंद्र प्रस्तावित आहे. तसेच नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीकरीता जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यामध्ये 2 केंद्र तर चांदुर रेल्वे, दर्यापूर, धारणी, नांदगाव खंडेश्वर, नेरपिंगळाई ता.मोर्शी, तळवेल ता.चांदुर बाजार व तिवसा येथे प्रत्येकी एक प्रमाणे नऊ ठिकाणी खरेदी केंद्र प्रस्तावित आहे. तरी शेतकरी बांधवानी खरेदी केंद्रावर नोंदणी करुन शासकीय किमान आधारभुत किंमतीप्रमाणे सोयाबीन व कापूस विक्री कर

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार   अमरावती, दि. 25 (जिमाका): आगामी निवडणुकीत मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत नवमतदार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.   14 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी सभागृह, मोर्शी रोड अमरावती येथे मतदार जनजागृती व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी, मनपा आयुक्त देवीदास पवार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे निबंधक तुषार देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसिलदार विजय लोंखडे आदी यावेळी उपस्थित होते.   श्री. कटियार म्हणाले की, निवडणूकीत घटत असलेले मतदानाचे प्रमाण चिंतेचा विषय

शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौरा; कृषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन

  शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौरा; कृषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 24 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित शेती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.   राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत वेळोवेळी होत असलेले बदल, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यात विविध देशांनी विकसीत केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान, विविध देशातील शास्त्रज्ञ, विकसीत शेतकरी यांच्याशी चर्चा, क्षेत्रिय व संस्थान

विभागस्तरीय नोडल अधिकारी प्रशिक्षण; निवडणूक संदर्भात प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन

Image
  विभागस्तरीय नोडल अधिकारी प्रशिक्षण; निवडणूक संदर्भात प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन                     अमरावती, दि. 24 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूकीशी संबंधित अमरावती विभागातील जिल्हा नोडल अधिकारी यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध विषयावर प्रशिक्षकाव्दारे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच विभागातील सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.   लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूकीच्या संबधित अमरावती विभागातील अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नोडल अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील प्रशिक्षण देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले होते. त्याअनुषंगाने आज एक दिवसाचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात सकाळी 10 वाजेपासून झाली. यात निवडणूक प्रक्रिया पूर्व आणि पश्