Wednesday, January 10, 2024

सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करावे

 सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करावे

 

 

अमरावती, दि.09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक आस्थापनानी ई-आर-1 प्रपत्राची माहिती ऑनलाईन  दि. 31 जानेवारीपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

 

 ई-आर-1 प्रपत्राची माहिती सादर करण्यासाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. डिसेंबर 2023 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे.

 

ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्याच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 आहे. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद संबंधित विभागाने घ्यावे, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...