Wednesday, January 17, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

            अमरावती, दि. 17 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षातील नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे व नुतनिकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज घेण्यास मुदत वाढ देण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

अनुसूचित जाती व नावबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी swadharyojana.com या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दि. 12 जानेवारी 2024 होती. परंतु वरीष्ठ कार्यालयाच्या निर्देशानानुसार पात्र विद्यार्थीं योजनेपासून वंचित राहू नये यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज व  कागदपत्रे कार्यालयात सादर करावे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...