मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरूवात

 

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरूवात

अमरावती, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र शासनाकडून 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत जमा होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या रकमेमधून निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयास सात दिवसाच्या आत जमा करावी, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 केंद्र शासनाकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत सन 2021-22 व 2022-23 वर्षातील 60 टक्के रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा  करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास जमा करावयाची आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती