समाजकार्य महाविद्यालयात 'माझा देश :

विकसित भारत-2047' विषयावर निबंध स्पर्धा संपन्न





अमरावती दि.१९-  अमरावती येथील भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र व समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी 'माझा देश : विकसित भारत-2047' विषयावर  निबंध स्पर्धा घेण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. तुळशीराम राठोड होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क अमरावती विभागाचे उपसंचालक अनिल आलूरकर   यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात आले होते.

यावेळी "युवकांच्या कल्याणासाठी शासकीय योजनांची भूमिका" या विषयांवर प्रा. शिवाजी तुप्पेकर यांनी तर "देशाच्या विकासात युवकांची भूमिका" या विषयावर प्रा.डॉ. //राजकुमार दासरवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

 

उपसंचालक अनिल आलूरकर व  मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेच्या यशस्वी स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्रतिक्षा गाडेकर हीने पटकावला तर द्वितीय क्रमांक अनिकेत महल्ले व तृतीय क्रमांक अभिजित गजभिये यांनी पटकावला. प्रोत्साहनपर पुरस्कार ऋषिकेश शाहाकार, जोहेब सौदागर, श्वेता सवई, तनवी ढगे, नुरीना थोरात, देवानंद चिमोटे, तेजस्विनी तायडे या 7 विद्यार्थाना देण्यात आले. या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक विद्यार्थानी सहभाग नोंदवला. अनिल आलुरकर आणि प्राचार्य राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. राजकुमार दासरवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. संकेत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकेत लोहकरे, तन्वी ढगे,जोहेब सौदागर, ऋषिकेश शाहाकार, गौरव वाडेकर, विक्रांत मोरे, प्रतिक्षा गाडेकर आदि विद्यार्थानी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी‌ यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी तुप्पेकर यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती