विभागस्तरीय नोडल अधिकारी प्रशिक्षण; निवडणूक संदर्भात प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन
लोकसभा
निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूकीच्या संबधित अमरावती विभागातील अधिकारी यांची नोडल
अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नोडल अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील
प्रशिक्षण देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले होते. त्याअनुषंगाने आज एक दिवसाचे
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात सकाळी 10 वाजेपासून
झाली. यात निवडणूक प्रक्रिया पूर्व आणि पश्चात सादरीकरणाव्दारे नियमावलींसह सांगण्यात
आली.
पहिल्या
टप्प्यात अकोला येथील उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर
उमेदवारांचे नामांकन अर्ज, पात्र व अपात्रतेची छाननी, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप
अशा विविध विषयाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीप
अपार यांनी जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्राची निवड, केंद्रावरील व्यवस्था,
सोयीसुविधा तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची व्यवस्था, पोलिंग पार्टी
व्यवस्था आदीबाबत माहिती दिली.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय
अधिकारी शैलेश काळे यांनी आदर्श आचारसंहिता खर्चाचे निरीक्षण, मीडिया तक्रार, एमसीएमसी
समिती व पेड न्यूजबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश
काळे यांनी ई- रोल, इरो नेट, स्वीप व आयटी ॲप्लीकेशनबाबत माहिती दिली. तर प्रशिक्षणाच्या
शेवटच्या टप्प्यात अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संजय गारकर यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट,
मतमोजणी आणि निकालाची घोषणा, पोस्टल बॅलेट व इटीबीपीएस याबाबत मार्गदर्शन केले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment