Monday, January 8, 2024

उमेद तर्फे तीन दिवसांचे ‘मिनी सरस’ प्रदर्शनी; 50 स्वयं सहाय्यता समूहाचा सहभाग नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा


 

उमेद तर्फे तीन दिवसांचे ‘मिनी सरस’ प्रदर्शनी; 50 स्वयं सहाय्यता समूहाचा सहभाग 

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा

 

              अमरावती, दि. 08 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) मार्फत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या साहित्याची 'मिनी सरस' विक्री प्रदर्शनी दि. 12 ते 14 जानेवारी दरम्यान सायन्स स्कोर मैदान, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत स्वयं सहाय्यता समूहाव्दारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ व वस्तूचे 50 स्टाँल लावण्यात येणार आहे. तीन दिवशीय प्रदर्शनीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

 

ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे सबलीकरण व उपजीविका आधारित उपक्रम उमेदमार्फत राबविण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री प्रदर्शनीचे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील 30 स्वयं सहाय्यता समूह तसेच अमरावती व नागपूर विभागातील प्रती जिल्हा दोन स्वयं सहाय्यता समूह असे एकूण 50 समूहाचे स्टाँल लावण्यात येत आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात येणार आहे. या मिनी सरस प्रदर्शनीमध्ये 5 स्टाँल शाकाहारी ज्यामध्ये रोडगे, पिठल, भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी यांचा समावेश आहे. तर 5 स्टाँलवर मासाहारी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

 

              प्रदर्शनीमध्ये नागरिकांना कळधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, पंचरत्न लाडू, मोह लाडू, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, सोया प्रोडक्ट, सोया इडली, ढोकळा, हेल्दी आरोग्याकरिता मोरिंगा पावडर, हळद पावडर, सर्व प्रकारचे लोणचे, खारोडी, जवस चटणी, खडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणाच्या धूप बत्ती, मुंग वडी, मकरसंक्रांत निमित्त हलव्याचे दागिने व तिलगुडिया व बांबू पासून विविध आकर्षक वस्तू विक्री करिता या प्रदर्शनीमध्ये मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रीती देशमुख यांनी दिली आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...