जिल्हा सेस निधीतून दिव्यांग व्यक्तीसाठी वैयक्तिक लाभ योजना; 22 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन

 जिल्हा सेस निधीतून दिव्यांग व्यक्तीसाठी वैयक्तिक लाभ योजना;

22 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन

 

        अमरावती, दि. 18 (जिमाका): दिव्यांग 5 टक्के जिल्हा सेस निधीमधून निराधार दिव्यांग निर्वाहभत्ता योजना व दिव्यांग व्यक्तींच्या विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेंतर्गत दिव्यांगाना वैयक्तिक लाभ दिल्या जातो. या दोन्ही योजनाचा पात्र दिव्यांगानी लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सोमवार दि. 22 जानेवारीपर्यंत संबंधित गट विकास अधिकारी व पंचायत समिती येथे सादर करावे, असे आवाहन दिव्यांग विभाग तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 

             सन 2023-24 मध्ये निराधार, निराश्रीत व अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना 55 वर्षानंतर एका व्यक्तीला वार्षिक 9 हजार रूपये निर्वाह भत्ता तसेच दिव्यांग विवाह योजनेंतर्गत दोघेही दिव्यांग असल्यास त्यांना 25 हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतो. या दोन्ही वैयक्तिक योजनेंचा लाभासाठी विहित नमुन्याचा अर्ज संबंधित गट विकास अधिकारी व पंचायत समितीमध्ये आवश्यक कागदपत्रासह स्विकारण्यात येत आहे.

 

निराधार दिव्यांग निर्वाह भत्ता योजना

           

पात्रता : दिव्यागांचे वय 1 एप्रील 2022 रोजी 55 वर्षापेक्षा कमी नसावे, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, आधार कार्ड लिंक बॅक पासबुक झेरॉक्स, वयाबाबत पुरावा, कुटूंबात एकापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या सर्व सदस्यांचे नाव एकाच राशन कार्डमध्ये असणे आवश्यक राहील.

 

विवाहित दिव्यांग व्यक्तीसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना

 

पात्रता : विवाह नोंदणी दाखला(विवाह 1 एप्रील 2014 नंतर केलेला असावा), वर व वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले, वर व वधु यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अपंगत्वाची टक्केवारी 40 किंवा 40 पेक्षा अधिक असावी. वर व वधु यांचे एकत्रित फोटो, दोन प्रतिष्ठित व्यक्तीची शिफारसपत्र, वर व वधुचे बॅंकेचे संयुक्त खाते, बॅकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, आयएफएससी कोड व आधार कार्ड तसेच लिंक असलेले बॅंकेचे पासबुकची छायांकित प्रत.

000000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती