महाकृषी ऊर्जा अभियान; लाभार्थी शेतकऱ्यांनी सात दिवसात लाभार्थी हिस्सा भरण्याचे आवाहन

 

महाकृषी ऊर्जा अभियान; लाभार्थी शेतकऱ्यांनी सात दिवसात लाभार्थी हिस्सा भरण्याचे आवाहन                                                                   

अमरावती, दि. 19 (जिमाका): महाकृषी ऊर्जा अभियान (पी.एम.कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचे संदेश पाठविण्यात आले आहे. लाभार्थ्यांना प्राप्त झाालेल्या संदेशानुसार लाभार्थी हिस्सा सात दिवसांच्या आत भरणा करण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापकाचे प्रफुल तायडे यांनी केले आहे.

महाकृषी ऊर्जा अभियान (पी.एम.कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत कुसुम ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त असलेल्या अर्जांची पडताळणी करुन पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना  मुख्यालयाकडून लाभार्थी हिस्सा भरण्याचे संदेश वितरीत केले जातात. जिल्ह्यातील 456 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला असूनही त्यांनी अद्याप लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. तसेच अश्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती यांचेकडून वेळोवेळी पत्राव्दारे तसेच भ्रमणध्वनीव्दारे लाभार्थी हिस्सा भरणेबाबत कळविण्यात आलेले आहे. पात्र लाभार्थ्यांनी सात दिवसांच्या आत मेडा बेनीफिशरी अपलिकेशन या ऑनलाईन ॲपव्दारे लाभार्थी हिस्सा भरणा करावा. तसेच लाभार्थी हिस्सा भरणा करते वेळी काही अडचणी आल्यास दुरध्वनीवर क्रमांक 0721-2661610 किंवा domedaamravati@mahaurja.com  या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती